महिलादिन संपतो..
आणि ती आज पुन्हा दिसते..
रमलेली आपल्याच चौकोनी विश्वात..
असतात फक्त तिच्याजवळ..
शेलके शब्द घरच्याच वरिष्ठ महिलांचे..
पोरांच्या तक्रारी..
नव-याची बोचरी टीका..
भांडी पाणी…
कपडेलत्ते..
चूल नी मूल…
ञागा नि चिंता..
उसनवार नी उधार…
महिलादिन संपतो..
आणि ती आज पुन्हा दिसते…
रस्त्यावरून धावतपळत..
आॅफीसच्या विचारात…
आज पुन्हा रोखून पाहणा-या..
लोकल,बेस्ट,गर्दीतल्या..
कालसाठीच म्हणे पतीतपावन झालेल्या नजरा चुकवत..
महिला दिन संपतो..
आणि ती आज पुन्हा दिसते..
थकवा,ताण,मरगळ झटकून..
कातरवेळी घराची वाट धरताना..
महिलादिनी तिला मिळालेली फुलं..
आज सुकलीत जणू..
तिच्या सुकलेल्या भावनांसारखीच..
एकच असतो म्हणे तिचा महिलादिन..
बाकी वर्षभर ती जगते जणू होवूनी ‘दीन’ !
लेख संकलन – निलेश बडगुजर, धुळे

Leave a Reply