समाजातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यातून समाज घडणीचे बाळ संस्कार देणे गरजेचे – सौ. नंदिनी अरुण बडगुजर

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर समाज महिला समिती आयोजित बडगुजर समाज महिलांचा प्रथम मेळावा दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यवरांच्या उपस्थित साजरा झाला.
या समाज मेळाव्यास खानदेशातील तसेच तीन राज्यातील मान्यवर महिलांनी उपस्थिती दाखविली. या मेळाव्यात महिलांचे सक्षमीकरण या प्रमुख हेतूने औरंगाबाद येथील निवृत्त न्यायाधीश श्री गोंधळी कर त्यांच्या पत्नीसह प्रमुख उपस्थित होते श्रीमती गोंधळी कर मॅडम यांनी वकील या नात्याने तसेच आंतरराष्ट्रीय महिला वक्या या नात्याने महिलांच्या प्रमुख जबाबदाऱ्या तसेच अधिकारही स्पष्ट केले श्रीमती पाटील यांनी येथील महिला सक्षमीकरण वक्त्या श्रीमती पाटील स्त्रीचे समाजातील महत्व भावपूर्ण स्पष्ट केले . समाजाने नव समाज घडविण्यासाठी समाजातील अनावश्यक चाली रिती बंद करण्यासाठीचे पहिले पाऊल यावेळी महिलांसोबत उचलले. यातूनच समाजाने महिलांचा सन्मान केला. येणाऱ्या काळात मुलींना केवळ शिक्षण देऊन सुशिक्षित करणे एवढी जबाबदारी न देता समाजातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यातून समाज घडणीचे बाळ संस्कार समाजाने केले पाहिजेत त्यासाठी आताची महिला सक्षम हवी म्हणून अधिकाधिक महिलांनी वेगवेगळ्या कार्य स्तरावरून समाजाचे, विशेषतः स्वतःचे सक्षमीकरण केले पाहिजे असा संदेश मुंबईतील पहिला वर्गातर्फे श्रीमती नंदिनी बडगुजर यांनी दिला .
श्री उमेश करोडपती सर यांनी नेहमीप्रमाणे या सर्व समाज मेळाव्याची धुरा सपत्नीक आपल्या परिवारासह बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ पारोळा येथे अत्यंत सुंदर अशा व्यवस्थेत सुग्रास भोजनासह सांभाळली. समाजातील त्यांचे हे दान शूरत्व नेहमीच उल्लेखनीय वअनुकरणीय राहीन .
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन परिवार ,बडगुजर आज महिला समिती, मुंबई .

सौ. नंदिनी अरुण बडगुजर अंबरनाथ( ठाणे)
उपाध्यक्षा
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई

सौ. नंदिनी अरुण बडगुजर अंबरनाथ( ठाणे)
उपाध्यक्षा
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई

3 Comments

  1. नंदिनी मॅडम आजून सविस्तर लिहिणे अपेक्षित आहे।
    आसो तुमचे अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*