धुळे लोकसभा निवडणूक समितीवर श्री. निखिल सूर्यवंशी यांची नियुक्ती

धुळे ः देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. यात लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्या सदस्यपदी सकाळ मीडिया ग्रुपचे धुळे जिल्हा प्रमुख (ब्युरो चीफ) तथा खानदेश आवृत्तीचे असिस्टंट चीफ रिपोर्टर निखिल निर्मलकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. 
माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीचे केबल नेटवर्क, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाद्वारे निवडणूक विषयक जाहिराती प्रसारणावर नियंत्रण ठेवणे, प्रसारणासंबंधी आलेल्या अर्जावर कार्यवाही करणे, प्रसारणास मान्यता देणे, पेड न्यूजवर देखरेख ठेवणे, आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पेड न्यूजबाबत कार्यवाही करणे आदी कार्य आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, श्री. सूर्यवंशी आदी उपस्थित होते. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा (जि. धुळे) आणि मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण (जि. नाशिक), असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. 
लोकसभेच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकींतर्गत स्थापन होणाऱ्या या समितीवर श्री. सूर्यवंशी यांची नियुक्ती होत आहे. त्यांच्या पत्रकारितेतील एकूण 19 वर्षांच्या वाटचालीत अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. ठिकठिकाणी व्याख्याने देताना विविध पदांची जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत. ते प्रख्यात (कै.) ऍड. निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी यांचे सुपुत्र आहेत. 
श्री. निखिल सुर्यवंशी – धुळे
(contact no. : 98810 90464)

श्री. निखिल सुर्यवंशी, धुळे

श्री. निखिल सुर्यवंशी यांची धुळे लोकसभा निवडणूक समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

शुभेच्छूक :

?अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

?बडगुजर प्राऊड ग्रुप

11 Comments

    • श्री. निखिल सुर्यवंशी यांची धुळे लोकसभा निवडणूक समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली. आपल्य कार्यशैलीची
      दखल घेतली गेली. मनपुर्वक अभिनंदन.

  1. धुळे लोकसभेची जबाबद्री यशशवीपणे पार पाडून नाव लौकिक मिळवावा होच सदिच्छा
    माजी सचिव मुंबई विभाग
    सुनील बडगुजर

  2. श्री. निखिल सुर्यवंशी, धुळे लोकसभा निवडणूक समितीमध्ये आपली नियुक्ती झाली. आपल्या कार्यशैलीची
    दखल घेतली गेली. मनपुर्वक अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published.


*