आज सध्याच्या परिस्थितीत कॅरियर निवडताना पालकांसह विद्यार्थी देखील संभ्रमात पडलेली दिसून येतात काही विद्यार्थी करियर निवडताना जर चुकले तर त्यांचे दिवस किंवा महिने वाया न जाता वर्षे वाया जातात मग अशा परिस्थितीत कॅरियर निवडण्यासाठी काय केलं पाहिजे? कोण मदत करेल? तर कॅरियर निवडण्यासाठी आपण स्वतःच आपली मदत करू शकतो. करिअर निवडण्यासाठी जास्त कसरत करण्याची गरज नाही स्वतःलाच काही प्रश्न विचारले तर कॅरियरचा मार्ग मोकळा होतो. करिअर निवडण्यासाठी मुख्यतः तीन गोष्टींची महत्वपूर्ण अशी दखल घेतली म्हणजे सहज कॅरियर निवडता येते त्या तीन गोष्टी म्हणजे आवड ,संधी आणि क्षमता आपली आवड कुठल्या क्षेत्रात आहे? त्या क्षेत्रात किती प्रमाणात संधी मिळण्याचे पर्याय आहेत? आणि मी निवडलेल्या क्षेत्राला पेलण्यासाठी मी किती प्रमाणात सक्षम आहे ? हे तीन प्रश्न जर आपण स्वतःला विचारले तर करियर निवडण्यास सोपे जाते. हल्ली करियर निवडताना स्वतःवर भरोसा न ठेवता मित्राच्या निवडलेल्या करियर वर मुलं जास्त भरोसा ठेवतात. बऱ्याच मुलांचे निकाल लागल्यानंतरही करियर कुठले निवडायचे ?मी कुठल्या क्षेत्रात पाऊल ठेवले पाहिजे? हे निश्चित नसते म्हणून हल्लीच्या काळात मुलंही करियरच्या बाबतीत चुकतांना दिसून येतात. करियर निवडताना अजून मुख्य गोष्ट म्हणजे छंद, स्वप्न आणि नोकरी यांचा देखील आपण विचार केला तर भविष्यात करियर निवडताना आपण कमी पडत नाहीत. सध्या इयत्ता १० वीच्या वर्गासाठी महाराष्ट्र शासनाने कलचाचणी ची सोय केली आहे कलचाचणी तून विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्षानंतर त्याचे कॅरियर कुठल्या क्षेत्रात चांगल्या रीतीने घडु शकते याचा कल समजतो व तो त्या दिशेने वाटचाल करतो. आज च्या काळात कॅरियर साठी भरपूर संधी उपलब्ध आहेत फक्त गरज आहे ती योग्य त्या दिशेची व मार्गदर्शनाची. पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या बाबतीत कधीही चुकू नका. कॅरियर आपल भविष्य ठरवत असतं व त्यानेच आयुष्य सुधारतं म्हणून भावनेच्या भरात परिस्थितीच्या अंती कॅरियर निवडताना विचारपूर्वक निवडावे आपल्या मुलाची आवड लक्षात घेऊन व त्या क्षेत्रातील संधी व आपल्या मुलांमध्ये असलेल्या क्षमता जाणून मगच कॅरियरची निवड करावी. आपल्या मुलाचे भविष्य आपल्याच हातात आहे. फक्त गरज आहे ती पारखण्याची. मुलांनी करिअरच्या संदर्भात चर्चा करताना मित्रांशी चर्चा न करता स्वतःशीच चर्चा करावी. करिअरच्या आड परिस्थितीला कधीही आणू नये. परिस्थितीचा नाव सांगून माणूस दुबळा होतो. परिस्थितीवर मात करतो तोच भविष्य घडवतो. आपल्याला इतिहासात बरिच उदाहरणे मिळतात ज्यांनी परिस्थितीवर मात करून इतिहास घडवला आहे. म्हटले जाते माणसांने असे जगावे, असे जगावे की इतिहासाने त्याच्यासाठी एक पान राखावं असेच इतिहासाचे सुवर्णपान तुमच्या ही आयुष्यात लिहिलं जाव आणि आपल्या बडगुजर समाजाच्या इतिहासात देखील लिहिले जावे हीच अपेक्षा आणि सदिच्छा?
लेखन – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी


ChandrakantSirजी Suppper narration.
Thank you sir