जागतिक महिला दिना निमित्त पुणे येथील प्रभाग क्रमांक 11 येथे आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात अनेक महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. तसेच महिला दिनानिमित्त महिला मॅराथॉन 2019 चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये कार्यक्रमास उपस्थित महिलांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना सौ. सारिकाताई पवार-बडगुजर यांच्या असते ट्रॉफी व प्रमाणपत्र वाटून सत्कार करण्यात आला.

तसेच महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यासाठी झुम्बा डान्स सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन सौ. सारिकाताई पवार-बडगुजर यांनी केले होते. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 11 मधील महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.


Leave a Reply