महत्वाचे कालमर्यादीत
भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO यांचा शालेय विद्यार्थ्याना करिता YOUNG SCIENCTIST PROGRAMM (YUVIKA) या असलेल्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची नामांकने भरणे बाबत….
शालेय विद्यार्थ्यांचे अवकाश विज्ञान, अवकाश तंत्रज्ञान व त्यांचे उपयोजन याबाबतचे ज्ञान वाढवून या विषयाबाबत त्यांना आवड निर्माण व्हावी. या क्षेत्रात तरुण शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून वरील कार्यक्रमांची आखणी करण्यात आलेली आहे.
सदरील कार्यक्रम उन्हाळ्यातील सुट्टी मध्ये दोन आठवडे ISRO मार्फत निशुल्क घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी राज्यातून राज्य मंडळ/CBSE/ICSE चा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांतून 8 वी पास असणाऱ्या व 9 वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या 3 विद्यार्थ्यांची निवड राज्याद्वारे केली जाणार आहे.
याकरिता विद्यार्थी निवडीसाठी राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत विज्ञान विभागामार्फत ही लिंक विकसित केली आहे.
9 वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील लिंक दि. 14 मार्च 2019 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरण्या बाबत सर्व शाळांना कळवण्यात येत आहे. इच्छुक शाळांनी खालील लिंक विद्यार्थ्यांमार्फत भरावी.
www.surveymonkey.com/r/ISROSLCT


Leave a Reply