पुणे येथील लकी बडगुजर यांचे “रहस्य” या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवड

लकी बडगुजर

लकी जगदीश बडगुजर, आकुर्डी, पुणे येथील राहत असून त्यांचे मुळ गांव धुळे आहे.‌ ते धुळे येथील जगदीश सिताराम बडगुजर यांचे चिरंजीव आहेत.

लकी बडगुजर यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण Xt. Xavier Canossa Convent Highschool, धुळे येथे पुर्ण केले. त्यानंतर लकीने डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फस्ट क्लास मध्ये पुर्ण केले. बी. ई. इन मेकॅनिकलचे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी मध्ये घेतले. आता ते एम. बी. ए. (इंटरनेशनल बिझनेस) चे शिक्षण जे. एस. पी. एम. कॉलेज, पुणे मध्ये घेत आहेत.

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि त्यात त्यांची चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी निवड झाली.

गायक आदर्श शिंदे सोबत लकी बडगुजर

रहस्य हा एक मोठा हॉरर सिनेमा असुन मराठी चित्रपटसृष्टिमधील एक नवीन प्रयोग असणार आहे. या फिल्म मधे जास्तीत जास्त विज़ुअल इफेक्ट्स(VFX) चा वापर करण्यात आला आहे. तरी आता या फिल्म चे काम अंतिम टप्प्यात आले असुन लवकर रिलिज करण्याचा प्रयत्न चालू आहे…

या फिल्म चे ट्रेलर आणि सॉंग्स मे 2019 मधे महाराष्ट्रभर प्रदर्शित होतील.

रहस्य या चित्रपटाचे भावेश प्रोडक्शन निर्माते असून श्री. भावेश पाटील यांनी दिग्दर्शन केले आहे आणि प्रोड्यूस श्री. दिनेश पाटील आणि संजय बागुल करीत आहेत.

लकी बडगुजरचे या चित्रपटासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व परिवार, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचे कडून कौतुक केले जात आहे.

हार्दिक अभिनंदन.

शुभेच्छूक :
बडगुजर प्राऊड ग्रुप

3 Comments

  1. बडगुजर समाजासाठी अभिमानास्पद,लकीचे अभिनंदन?

Leave a Reply to राजेंद्र बडगुजर, चिंचोलीकर Cancel reply

Your email address will not be published.


*