नंदुरबार येथे ३ मार्च रोजी बडगुजर समाजाचा स्नेह मेळावा

नंदुरबार येथे ३ मार्च रोजी
बडगुजर समाजाचा स्नेह मेळावा
नंदुरबार-येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे दि.३ मार्च रविवार रोजी ‘स्नेह मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘हळदी कुंकू’ व ‘वार्षिक मिटींग’ तसेच सर्वांसाठी विविध प्रकारचे ‘खेळ’ त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.
येथील नगरपालिका शाळा क्र. १ येथे दि.३ मार्च २०१९ रविवार रोजी होणार्‍या या बडगुजर समाजाच्या स्नेह मेळाव्यात सकाळी ९.३० वाजता हळदी-कुंकू, १० वाजता विविध खेळ, ११ वाजता समाजाची वार्षिक मिटींग तसेच ११.३० वाजता स्नेह भोजन होणार आहे. यावेळी खेळात महिला, मुले-मुली तसेच पती-पत्नी आदीं कार्यक्रमात सहभाग घेवू शकतील. तरी बडगुजर समाज बंधू-भगिनींनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय संतोष बडगुजर, सचिव अश्‍विन भालचंद्र बडगुजर तसेच मंडळाच्या पदाधिकार्‍यांतर्फे करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*