
अनिष्ट रूढी बंद करण्याबाबत सामाजिक ठराव मंजूर
पारोळा – येथे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत ‘न भूतो न भविष्यती’ असा ऐतिहासिक पहिला महिला मेळावा बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाच्या शैक्षणिक संकुलात सकाळी ९ ते ५ या वेळात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी बडगुजर अॅप व बडगुजर वेब पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. तसेच समाजातील अनिष्ट रूढी बंद करण्याबाबत सामाजिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
शिस्तबद्ध नियोजनात संपन्न झालेल्या व डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बडगुजर समाजाचे अध्यक्ष मा. श्री. उमेशआप्पा करोडपती हे होते. दिप प्रज्वलन खासदार ए. टी. पाटील यांनी केले प्रतिमापूजन डॉक्टर सतीश पाटील यांनी केले.
व्यासपीठावर मा. आ. चिमणराव पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष श्री. करण पवार, न्या. विकास गोंधळेकर, पब्लिक प्रॉसिक्युटर अर्चना गोंधळेकर आशादेवी पाटील, महिला समितीचे प्रमुख सौ. रत्नाताई बडगुजर धुळे, बोर्डिंगचे अध्यक्ष श्री. आनंदा सूर्यवंशी महासमितीचे उपाध्यक्ष श्री. भगवान बडगुजर, महासचिव श्री. राजेंद्र बडगुजर संघटक श्री. हिरालाल दोडे, महिला संघटक सौ. सुनंदाताई बडगुजर, खजिनदार सौ. देवयानी बडगुजर,. नाशिकच्या नगरसेविका सौ. हर्षाताई बडगुजर, धुळ्याच्या नगरसेविका सौ. स्नेहल जाधव, पारोळाच्या नगरसेविका सौ. जयश्रीताई बडगुजर, भातखेड्याच्या सरपंच सौ. शोभाबाई बडगुजर, पिंप्रीच्या सरपंच सौ. योगिताताई सूर्यवंशी, बालाजी विद्या प्रबोधनी मंडळाचे सचिव सौ मंगला करोडपती, सौ. भावना बडगुजर हे मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमांच्या अध्यक्षांसह व्यासपीठावरील बडगुजर समाजाच्या कोणत्याही मान्यवरांचे सत्कार स्वीकारला नाही. या निर्णयाचे आमदार खासदार आमदार खासदारांनी आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर महिला समिती प्रमुख सौ. रत्नाताई बडगुजर यांनी प्रास्ताविकात वैवाहिक व कौटुंबिक समस्यांचे निराकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
संवाद विकासाची भरारी घेणाऱ्या बडगुजर वेब पोर्टल www.badgujar.in चे लोकार्पण अॅड. सतीश पाटील यांच्या हस्ते तर संवादाची श्रृखंला गुंफणाऱ्या
मोबाईल ॲपचे लोकार्पण खासदार ए. टी. पाटील यांच्या हस्ते झाले.
मा. डॉ. सतीश पाटील म्हणाले की, बडगुजर समाजाला ओबीसी आघाडी सरकारने मिळवून दिल्याची आठवण करून दिली. करोडपती सर शिक्षकाच्या नोकरी निमित्त पारोळ्यात येऊन त्यांनी बालाजी शैक्षणिक संकुल उभारून शिक्षणाची गंगोत्री येथे आणली, त्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.
खासदार ए. टी. पाटील म्हणाले की, बडगुजर समाज हा प्रमुखाने ग्रामीण भागात विसावलेला असून महिलांना स्वातंत्र्य हक्काची जाणीव व सबलीकरणासाठी हा मेळावा फायदेशीर असल्याचे प्रतिपादन करताना बडगुजर समाजाला केंद्रात ओबीसी म्हणून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.
मा. आ. चिमणराव पाटील यांनी महिला मेळाव्याबाबत गौरवोद्गार काढून देशात महिलांना 50 टक्के आरक्षण मिळालेले आहे. त्यामुळे आपल्या न्याय हक्काची जाणीव होण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात उमेश करोडपती यांनी महासमितीचे सर्व पदाधिकारी सदस्य, महिला समितीसह विविध समितीचे पदाधिकारी, गावा-गावातील समाज मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित असलेल्या महिलांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले. देश गाजवणाऱ्या महिलांचा देश आहे. त्यातून महिलांनी प्रेरणा घ्यावी. सावित्रीच्या शिकलेल्या सुना-लेकींना कर्तृत्वाची संधी द्यावी. मुलींनी सासु-सासर्यांना आई-वडिलांप्रमाणे वागावावे. आपल्या मुली माहेरचा ओढा कमी करण्याचा व मोबाईलचा उपयोग मर्यादित स्वरूपात करण्याचा सल्ला द्यावा, असा त्यांनी आग्रह धरला.
सामाजिक समस्यांचे निराकारण व कौटुंबिक संबंध या विषयावर बोलतांना औरंगाबाद हायकोर्टातील विधीतज्ञ सौ. अर्चना गोंधळेकर यांनी कायद्याचे ज्ञान व सामाजिक जाणिवा यात योग्य समन्वय घडवून आणल्यास महिलांचे सबलीकरण घडून येईल, असा आशावाद व्यक्त केला. महिला मेळाव्यात अशा प्रकारचे विषयावर चर्चा घडवून आणली जाते, याचा लाभ पुढील पिढीला निश्र्चितच मिळेल, असे आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या.
धुळे आकाशवाणीच्या निवेदिका आशादेवी पाटील यांनी महिलांशी ग्रामीण भाषेतून संवाद साधतांना दैनंदिन जीवनातील सोप्या उदाहरणांनी महिलांचे कुटुंबातील स्थान व महत्त्व पटवून दिले.
नाशिकचा नगरसेविका सौ. हर्षाताई बडगुजर यांनी आपल्या मनोगतात वेब पोर्टल व मोबाईल ॲप या उपक्रमाबाबत समाधान मानले. शिक्षण कमी असले तरी आत्मविश्वास चांगला असला तर यश मिळविणे अवघड नाही, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून सांगितले. सौ. नंदिनी बडगुजर यांनीही मनोगत व्यक्त केले.

समाजातील अनिष्ट रूढी चालीरीती यांना मूध्याती मिळवून देण्यासाठी सामाजिक ठराव नियोजन समितीचे प्रा. एच. आर. बडगुजर व महासचिव श्री. राजेंद्र बडगुजर सर यांनी मांडले. अध्यक्ष उमेश करोडपती यांनी ते ठराव मंजुरीसाठी सभेत ठेवले. चर्चा होऊन एकमताने खालील ठराव मंजूर करण्यात आले.
१) लग्नाचे व सामाजिक कार्यक्रमाचे आमंत्रण व्हाट्सअप वरून व फोनवरून सुपर उपस्थिती देणे.
२) साखरपुडा व विवाह यातील मानाच्या साड्या बंद करणे,
३) लग्नासाठी भाडे टाकले व स्वीकारणे बंद करणे,
४) लग्नात आहेर देणे व घेणे बंद करणे,
५) घोड्यावरुन उतरताना नवरदेव व सुखाचे पैसे न मागणे,
६) वेळेवर लग्न लावणे,
७) लग्नाच्या वेळी जेवतांना नारळ व खोबरे वाटी लावणे बंद करणे.
नियोजन समितीचे सुधीर पुजार्यांनी सामाजिक कार्यक्रम विडिओ सुरू करण्याबाबतचा ठराव मांडावा, अशी विनंती केली. तसेच सुभाष बडगुजर यांनी मुलीला बघायला जाताना सोबत मुलाला पण घेऊन जाणे व लवकर निर्णय द्यावा, असा ठराव मांडण्याची विनंती केली. हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
‘बेटी बचाओ देश बचाओ’ या उपक्रमाअंतर्गत संदेश देणाऱ्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तीन उत्कृष्ट कलाकृतींना रोख पारितोषिक देण्यात आली. सामाजिक संदेश देणारे नाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सौ. स्वाती बडगुजर व सौ. रेवती ताई बडगुजर यांनी केले.
महिला मेळाव्याच्या व्यासपीठापासून ते भोजना पर्यंतचा सर्व खर्च महासमितीचे अध्यक्ष व बालाजी प्रबोधनीचे उमेश करोडपती यांनी केला. सुरुची भोजनाचा मनसोक्त आनंद हजारोंच्या संख्येने आलेल्या उपस्थितांनी लुटला. सदर मेळाव्यात डॉ. सचिन बडगुजर, डॉ. चेतन बडगुजर, प्रविण बडगुजर, सुनील बडगुजर, गौरव बडगुजर, विजय बडगुजर, नथू बडगुजर यांनी स्वयंसेवकाची भूमिका साकार केली. त्यांचे सर्वांनी कौतुक केले. महिला मेळावा अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबद्ध झाल्याचे समाधान समाजबांधवांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. भविष्यात समाजातील उपक्रम अशाच पद्धतीने व्हावेत, अशी अपेक्षाही कार्यकर्ते व्यक्त करीत होते. शेवटी आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
पहिल्या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्ये :
? पहिल्या महिला मेळाव्याला सर्व पदाधिकारी व समाज बांधवांचे सहकार्य,
? व्यासपीठावर समाजातील सर्व विद्यमान महिला नगरसेवक व सरपंचांना यांना स्थान.
? अध्यक्षांसह कोणत्याही समाजातील मान्यवरांनी हार-तुरे सत्कार स्वीकारले नाहीत.
? मोबाईल मुळे संसार उध्वस्त होऊ देऊ नका असा मान्यवरांचा सल्ला,
? सामाजिक समस्या व कौटुंबिक संबंधावर न्या. गोंधळेकर यांची महिलांशी चर्चा,
? सौ. आशा पाटील यांनी सादला ग्रामीण भाषेतून संवाद,
? बडगुजर वेब पोर्टल आणि बडगुजर अॅपचे लोकार्पण,
? अनिष्ठ रूढी व चालीरीतींना मुठमाती देण्याचा ठराव मंजूर,
? बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन,
? सामाजिक संदेश देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन,
? मेळाव्याचा संपूर्ण खर्च महासमितीचे अध्यक्ष उमेश करोडपती यांनी केला.
? करोडपती कुटुंबाने बजावली स्वयंसेवकांची भूमिका.
? अत्यंत शिस्तबद्ध व न भूतो न भविष्यती असा आदर्श कार्यक्रम.
? भविष्यातील कार्यक्रम असेच व्हावेत अशी समाज बांधवांची अपेक्षा…!!!


सर्व अ. भा. महासमितीचे पदाधिकारी, महिला समिती सदस्य आणि आलेल्या सर्व महिलांचे मनःपुर्वक आभार… धन्यवाद

Leave a Reply