बॅडमिंटन स्पर्धेत शैलेश बडगुजर यांना ट्राॅफी
प्रतिनिधी | पुणे
येथील कॅपिटा अायटी कंपनीतर्फे १९ जानेवारी राेजी पुणे डिस्ट्रिक्ट मेट्राेपाेलिटियन बॅडमिंटन असाेसिएशन येथे अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या शैलेश भरत बडगुजर (माे. नं. ९८९०७२१२८१) यांनी जाेरदार कामगिरी केल्याबद्दल ट्राॅफी देण्यात अाली.
कॅपिटा अायटी कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांना प्राेत्साहन देण्यासाठी अंतर्गत क्रीडा स्पर्धा अायाेजित करण्यात अाल्या हाेत्या. यामधील बॅडमिंटन स्पर्धेत अाठ टिम सहभागी झाल्या हाेत्या. प्रत्येक टिमध्ये अंत्यत चुरशीचा व राेमाचक सामना झाला. प्रत्येक खेळांडूचा खेळ हा लक्षवेधीच हाेता. बॅडमिंटमध्ये शैलेश बडगुजर यांनी जाेरदार कामगिरी करुन यश मिळविले. त्याबद्दल त्यांना कंपनीचे मॅनेजर चेतन नाटेकर यांच्या हस्ते बक्षीस म्हणून ट्राॅफी, प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात अाले. तसेच इतर यशस्वी स्पर्धेकांना देखील बक्षीस देण्यात अाले. या वेळी कॅपिटा अायटी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. शैलश बडगुजर हे वर्षी (ता. शिंदेखेडा) येथील भरत अात्माराम बडगुजर व शशिकला भरत बडगुजर यांचे चिरंजीव अाहेत.


Leave a Reply