पारोळा (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बाभळेनाग फाट्यानजीक पारोळा येथील ओम नगर मधील बडगुजर दांपत्यास टँकरने धडक मारल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 17 रोजी 12- 45 वाजता घडली.
याबाबत श्रीं. विजय काळूराम बडगुजर वय 50 व त्यांची पत्नी सौ. सुनंदा विजय बडगुजर (वय 41) हे त्यांच्या (एम एच -१९-सी व्ही ७१३४) मोटरसायकलने पारोळा कडे येत असताना त्यांना एका टँकरने (एम एच ०४-एच एस १२८९)धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले जखमी दाम्पत्य रस्त्यावर पडलेले असताना येथील आमदार डॉक्टर सतीश पाटील हे जळगाव कडे जात असताना त्यांनी एका खाजगी रिक्षा थांबवून त्या रिक्षात धनराज शंकर मराठे यांना जखमींसोबत बसवुन त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात हलवले असता रस्त्यावर १०८ रुग्णवाहिकेने त्यां जखमींना घेऊन तात्काळ कुटीरमद्ये डाँ योगेश साळुंखे,परिचारिका डिंपल पाटील,शोभा बोरसे,राजू वानखेडे यांनी प्रथमोपचार करून डाँ राहुल जैन व प्रमोद सुर्यवंशी यांनी धुळे येथे हलविले.याबाबत पारोळा पो स्टे ला कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नव्हता.
आ डाँ सतिष पाटील यांची अशीही माणुसकी –
एरंडोल मतदार संघाचे आमदार डाँ सतीश पाटील हे *पारोळा येथील बडगुजर समाजाच्या महिला मेळाव्याचा कार्यक्रम आटोपून जळगाव कडे जात असतांना त्यांना रस्त्यात सदर बडगुजर समाजाचे दाम्पत्य जखमी अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी चालक गुलाब पाटील यांना गाडी थांबवून जखमींची विचारपूस केली व एरंडोल कडून येणारी रिक्षाला थांबवून *बडगुजर दाम्पत्यास* रिक्षात टाकून पुढील उपचारार्थ रवाना करून माणुसकीचे दर्शन दाखविले म्हणून बडगुजर समाजाने डाँ सतीश पाटील यांचे आभार मानलेत.

Leave a Reply