पुणे येथील कु. जिया महेंद्र पवार हिचे जेईई मेन्स परीक्षेत घवघवीत यश!

पुणे येथील श्री. महेंद्र धनलाल पवार व सौ. रोशनी महेंद्र पवार यांची सुकन्या कु. जिया महेंद्र पवार हिने नुकत्याच झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत ९५.३३% गुण मिळवित घवघवीत यश मिळवले आहे.

कु. जिया ही अतिशय हुशार विद्यार्थिनी असून तिने दहावी मध्ये सुद्धा ९१.००% गुण मिळविले होते. ती श्री चैतन्या कॉलेज, बावधन पुणे येथून बारावीचे शिक्षण घेत आहे.

तिच्या या यशामध्ये आई सौ. रोशनी पवार व वडील श्री. महेंद्र पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन भेटले. तिला भविष्यात अभियंता व्हायचे आहे. त्याकरता ती यथायोग्य प्रयत्न करीत आहे.

कु‌. जिया मिळालेल्या यशाबद्दल बडगुजर.इन टिम व बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी भव्य दिव्य शुभेच्छा! 🎉

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*