बडगुजर समाज विद्याप्रसारक मंडळ जळगांव च्या अध्यक्षपदी श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांची निवड

जळगाव – जळगांव येथील बडगुजर विद्याप्रसारक मंडळाची नुकतीच कार्यकारणी निवड करण्यात आली होती. या कार्यकारणी सदस्यांची आज दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये सर्वानुमते श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भुसावळ येथील श्री. निलेश शरदराव बडगुजर यांची उपाध्यक्षपदी, श्री बिपिन पठार सचिव पदी आणि बोर्डिंग सुप्रिंटनपदी श्री प्रदीप विश्वनाथ बडगुजर यांची निवड करण्यात आली.

अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली. सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्या प्रसारक मंडळ व बडगुजर बोर्डिंग चा विकास आणि जास्तीत जास्त समाज बांधवांना याचा फायदा कसा होईल याविषयी कार्य करण्याचे आश्वासन दिले.

सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी हे सामाजिक कार्यकर्ते असून समाज बनाना जोपासणारे व समजणारे आहेत. समाजाच्या तळागाळात जाऊन कार्य करणारं हे मंडळ, या नवनियुक्त अध्यक्षांच्या व कार्यकारणी सदस्य हे पुनश्च समाजसेवेसाठी जोमाने कार्य करतील.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे व कार्यकारणी मंडळाचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

2 Comments

  1. लिलाधर भाऊ व सर्व मंडळाचे हार्दिक अभिनंदन !

  2. Congratulations 🎉🎉🎉 Liladharji….but date is wrong…. please cheak and corrections 2026…not 2020….

Leave a Reply

Your email address will not be published.


*