दोंडाईचा येथील कु. लीना लक्ष्मीकांत बडगुजर यांनी आयआयटी मुंबई पवई येथून ” DNA लॅपटॉमर्स आणि अँटिबायोटिक प्रतिकाराविरुद्धच्या संशोधन करून प्रबंध सादर करून पीएचडी ( डॉक्टरेट) पदवी मिळवली – २८/२/२०२६ रोजी पदवी प्रदान समारंभ

दोंडाईचा येथील श्री लक्ष्मीकांत चूनीलाल बडगुजर यांची कन्या . कुमारी लीना लक्ष्मीकांत बडगुजर यांनी आयआयटी मुंबई पवई येथून
” DNA लॅपटॉमर्स आणि अँटिबायोटिक प्रतिकाराविरुद्धच्या संशोधन करून प्रबंध सादर करून पीएचडी ( डॉक्टरेट) पदवी मिळवली.
जिवाणू एंटीबायोटिक्स चा वापर करून स्वतःला वाचवतात ज्यामुळे सामान्य औषधे अपयशी ठरतात .ही जागतिक समस्या आहे भारतात ही समस्या खूप गंभीर आहे 70 टक्के पेक्षा जास्त जिवाणू प्रतिकारशील आहेत
डॉक्टर लीना यांनी रसायनशास्त्र विभागात आयआयटी पवई मुंबई येथे हे प्रेझेंटेशन दिले त्यांचे काम डीएनए लॅपटॉपर्स आणि स्मॉल मॉलिक्युल इन हीपीटर्स वापरून बायो फिल्म आणि प्रतिकार प्रथिनांना थांबवण्यावर आहे.

हे संशोधन अँटिबायोटिक प्रतिकारच्या जागतिक संकटावर प्रकाश टाकते आणि भविष्यातील औषध विकासाला मदत करेल. तसेच डॉ. लीना यांना मागील वर्षी UK येथील केंब्रिज युनिव्हर्सिटीत या संशोधनासाठी अहवाल सादर करण्यासाठी आयआयटी तर्फे पाठवण्यात आले होते . जागतिक स्तरावरील मान्यवर तज्ञांनी तेथे या विषयावरील संशोधनासाठी डॉ.लीना यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. सध्या डॉक्टर लीना ह्या आयआयटी पवई येथे संशोधन विभागात कार्यरत आहेत .लवकरच आयआयटी पवई येथे दि. २८/२/२०२६ रोजी पदवीदान समारंभात त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाईल .


याबद्दल दोंडाईचा येथील संपूर्ण शिंदे परिवार तसेच यावल येथील श्री वसंत देवराम बडगुजर आणि समस्त पड्याळ परिवार व बडगुजर.इन तर्फे डॉ. लीनाचे कौतुक आणि हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*