चाकण येथील आई सप्तशृंगी माता उत्सव समिती चाकण पंचक्रोशीतील खान्देश वाशी समाजबांधव यांच्या तर्फे आयोजित खान्देश गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक, उद्योग, कामगार व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान देण्यात येतो.
श्री दत्ताभाऊ पंचमसिंग परदेशी मित्रपरिवार व आई सप्तशृंगी माता उत्सव समिती चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांमध्ये पुणे येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनमोल कामगिरी करणाऱ्या सौ. सारिका महेंद्र पवार, मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री नारायण बडगुजर, सामाजिक क्षेत्रात काम करणारे श्री. कैलास बडगुजर, श्री. लोकेश कोतवाल, सौ. जयश्री बडगुजर, श्री. चुडामण बडगुजर बडगुजर समाजबांधवांना खान्देश गौरव पुरस्कार – २०२५ ने गौरविण्यात आले.
सौ. सारिका महेंद्र पवार,
सौ. जयश्री बडगुजर,
श्री. नारायण बडगुजर,
श्री. चुडामण बडगुजर,
श्री. कैलास बडगुजर,
श्री. लोकेश कोतवाल
सर्व पुरस्कारार्थींचे भारतीय बडगुजर समाज महासमिती, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply