संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या प्राध्यापक श्वेता बडगुजर यांना केंद्रिय संस्कृत विश्वविद्यालय दिल्ली कडून घेण्यात आलेल्या संस्कृत ऑलंपियाड 2024 या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर सामाजिक प्रगतस्तर गटामध्ये तृतीय पुरस्कार प्राप्त झाला . पुरस्कारात रोख पारितोषिक 5 (पाच) हजार रुपये , प्रमाणपत्र , मानचिन्ह आणि पुस्तके , देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्रिय संस्कृत विश्वविद्यालय दिल्ली आणि पतंजली विश्वविद्यालय हरीद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय शास्त्रोत्सव कार्यक्रम दि. 21/03/2024 रोजी हरीद्वार येथे पार पडला यावेळी केंद्रिय संस्कृत विश्वविद्यालय दिल्लीचे मा. कुलगुरू प्रो. डॉ. श्रीनिवास वरखेडी व पतंजली विश्वविद्यालय हरीद्वारचे मा. कुलगुरू श्री. बाळकृष्ण स्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय गुजरात चे मा. कुलगुरू प्रो. सुकांत कुमार सेनापती व इतर मान्यवर उपस्थित होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू श्री मिलिंद बाराहाते महोदय यांनी संस्कृत विभागाच्या या घवघवीत यशाचे तोंड भरून कौतुक केले.
सं. गा. बा. अमरावती विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या समन्वयिका प्रा. डॉ. संयोगिता देशमुख यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले. विद्यापीठाचा संस्कृत विभाग या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पुढील अनेक वर्षे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रा. श्वेता बडगुजर यांनी संस्कृत विभागाचे आभार मानले….
संस्कृत ऑलंपियाड ही परिक्षा संपूर्ण भारतातील तसेच भारताबाहेरील लोकदेखील देऊ शकतात. या परीक्षेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात आवेदन करता येते. परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या www.sanskritolympiyad.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या स्पर्धेचे शालेय महाविद्यालयीन तसेच सामाजिक असे वेगवेगळे स्तर आहेत.2024 च्या ओलंपियाड स्पर्धेत जवळपास 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. श्वेता अशोक बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply