नमस्कार, सर्व समाज बांधवांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, पुण्यातील सौ. राजश्री सुदाम बडगुजर यांनी 5 जुलै 2020 रोजी Rajshree Badgujar ह्या नावाने यूट्यूब चैनल सुरू केले होते . पाच वर्षांच्या आत या यूट्यूब चैनल ला 2,00,000(2लाख) म्हणजेच 200K सबस्क्राइबरर्स मिळालेत आणि ८ करोड ५० लाख प्रेषकांनी व्हिडिओज बघितले. एका युट्युबर साठी ही बाब फार अभिमानास्पद आहे. सौ. राजश्री मॅडम यांनी समाज उपयोगी अनेक कार्यक्रम आपल्या युट्युब वर दाखवण्याचा प्रयत्न केलेला असून प्रेक्षकांनी या कार्यास खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
यांनी आजपर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत परदेशात स्थिर दांपत्यांच्या मुलाखती, मरावे परी किती रुपे उरावे हा दिवंगत, निस्वार्थी समाज कार्य करणाऱ्या लोकनेत्यांचा ऑनलाइन कार्यक्रम,
पुण्यातील वधु वर परिचय मेळाव्यात कार्यक्रम समाजसेवक आण्णा हजारे यांची मुलाखत. आळंदी येथील माऊलींच्या मंदिरातील संपूर्ण माहिती व्हिडिओ ,आळंदी पंढरपूर वारी, वारीतील अनेक वारकऱ्यांची मुलाखती त्याचप्रमाणे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिर व गाथा मंदिर व्हिडिओ , पिंपळगाव हरेश्वर आणि पिंप्री येथील चामुंडा मातेच्या प्राणप्रतिष्ठापने चा कार्यक्रम , जागतिक महिला दिनानिमित्त अमळनेर येथे 40 महिलांच्या सन्मान सोहळा कार्यक्रम, सन्मान नवदुर्गांचा पुण्यातील काही प्रतिष्ठित, राजकीय किंवा शैक्षणिक महिलांचा मुलाखतींचा कार्यक्रम , धुळे येथील एकविरा मातेचा अध्यक्षांकडून माहिती व्हिडिओ , तसेच सेवानिवृत्त सीआयडी इन्स्पेक्टर यांची मुलाखत . असे एक ना अनेक कार्यक्रम राजश्रीताई सतत राबवित असताना.

युट्युब चे सिल्वर प्ले बटन(Silver Play Button ▶️) हा सन्मान मिळवणाऱ्या आपल्या समाजातील राजश्रीताई ह्या एकमेव युट्युब वर आहेत.
सौ राजश्री ताईंचे खूप खूप अभिनंदन💐💐व आपले जास्तीत जास्त फॉलोअर्स होवोत या शुभेच्छा
Leave a Reply