कढोली येथील रहिवाशी ह.मु. जळगाव येथील श्री अशोक मधुकर बडगुजर यांची सुकन्या कु मानसी हिने नोव्हे. २०२४ मधील सीए (Chartard Accoutant) ही परीक्षा प्रथम प्रयत्नात उतीर्ण केली. वडिलांचा औषध विक्रीचा व्यवसाय असून आई उत्तम गृहिणी आहेत. कु मानसीच्या आजी श्रीमती सिंधुताई मधुकर बडगुजर या कृषी विभाग, महाराष्ट्र शासन येथून सेवानिवृत्त आहेत. आजींचा खडतर-मूल्याधीष्टीत व संस्कारक्षम जीवन प्रवास, आई-वडिलांचे अथक परिश्रम व प्रेरणा ,दोनही काका- काकुनचे सहकार्य, मामांचे मार्गदर्शन आजी- आजोबा (आईचे आई-वडील) यांची साथ हे माझ्या यशाचे खरे वाटेकरी आहेत. अशी भावना कु मानसीने तिच्या यशाबद्दल व्यक्त केली.
सीए उत्तीर्ण झालेनंतर Axis बँक मुंबई येथे ट्रेझरी ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. कु मानसीच्या परीक्षेतील यश व निवडी झाल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिच्या यशाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अखिल भारतीय बडगुजर महासमितीकडून चे अध्यक्ष श्री सुरेश महाले व महासमितीचे पदाधिकारी च्या हस्ते कु. मानसीचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेछ्या दिल्या. कु मानसीचे यश संपूर्ण बडगुजर समाजासाठी गौरावास्पद आहे.
Hearty congratulations and best wishes for future life.