मांडळ ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली – श्री. मनीष बडगुजर, पुणे

मांडळ येथील ग्रामपंचायत सरपंच यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी दि १७ फेब्रुवारी रोजी येथे ग्राम पंचायत सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी कविता दीपक बडगुजर यांची एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जो गौरव यशवंत शिरसाठ आणि काम पाहिले. यावेळी तलाठी मधुकर पाटील, ग्रामसेवक प्रांजल वाघ उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच व परिवर्तन पॅनल प्रमुख किरण जवलिलाल जैन, माजी सरपंच विद्या बाई विजय पाटील, मीनल सुरेश कोळी, कुसुमबाई भास्कर पाटील, वसंत बलकृष्ण कोळी, उपसरपंच सुनंदाबाई प्रताप पाठी, विजय सिताराम कोळी, हनुमान सुरेश मोरे, मा. सभापती डॉ. दीपक पाटील, ग्राम पंचायत सदस्य मंगल मंगळदास तुकाराम कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अशोक हिम्मतराव पाटील, मा. चेअरमन संतोष पंडीलिक पाटील, मा. चेअरमन पंढरीनाथ विश्राम देशले, काशिनाथ निंबा बडगुजर विजय नथू पाटील, सुरेश लोटन कोळी, राजेंद्र अप्पा धनगर (तंटामुक्ती अध्यक्ष), जितेंद्र पोटट पाटील, नथू भारतराव पाटील, रावसाहेब पंडित कोळी शेखर यशवंत पाटील, भास्कर चैत्राम पाटील, अरुण संतोष कोळी, निलेश नारायण बडगुजर, शांताराम सखाराम कोळी, विकास शांताराम बडगुजर, वसंत बळीराम कोळी, हिम्मत काशिराम पाटील इत्यादी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर भव्य मिरवणूक काढत आली. गावातील सर्वांगीण विकासाकडे भर दिला जाईल. रस्ते, पाणी, वीज, याकडे लक्ष देऊन गावाचा विकास कसा साधता येईल याकडे लक्ष देण्यात येईल असे मनोगत नवनिर्वाचित सरपंच कविता दीपक बडगुजर यांनी व्यक्त केले. सौ.कविता दीपक बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*