मुळगाव पिंपळकोठा येथील रहिवासी निवृत्त एक्स सर्विस मॅन श्री राजेंद्र पोपट बडगुजर यांचे चिरंजीव. श्री सागर राजेंद्र बडगुजर हे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर हवालदार या पदावरून सिग्नल कॉर्प या विभागातून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम एरंडोल येथील लक्ष्मी नगर मध्ये दिनांक 2 डिसेंबर सोमवार या दिवशी आयोजित करण्यात आलेला होता.
श्री सागर बडगुजर हे 2004 मध्ये नाशिक येथून सिग्नल मॅन या पदावर भारतीय सैनिकी सेवेमध्ये प्रवेशित झाले त्यांची खडतर असे प्रशिक्षण गोवा या ठिकाणी पार पडले. त्यानंतर भटिंडा,जम्मू आणि काश्मीर, झासी, कोटा, कपूरतळा, उधमपूर अशा विविध ठिकाणी त्यांनी सलग 21 वर्ष सेवा दिली. यात प्रथम शिपाई या पदावर व त्यानंतर लान्स नाईक, तसेच नाईक आणि शेवटी हवलदार या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.
भारतीय सैनिकी सेवेचा वारसा लाभलेले अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील श्री राजेंद्र पोपट बडगुजर हे 1977 मध्ये सप्लाई कोड मध्ये शिपाई या पदावर भारतीय सैन्यामध्ये नियुक्त झाले होते. त्यांनी आसाम, लेह लडाख, जोधपूर, चंदीगड आसाम, अशा विविध ठिकाणी कर्तव्य बजावून 32 वर्षानंतर नाईक या पदावरून 1992 मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. वडिलांच्या याच सेवेचा आदर्श घेऊन सागर बडगुजर यांनी सुद्धा भारतीय सैन्यामध्ये जाण्याचा मानस केला होता. एकमेव मुलगा असलेल्या अशा वडिलांनी आपला मुलगा भारतीय देशसेवेसाठी दिला ही बाब खरंच उल्लेखनीय आहे. असं म्हणतात की,
आओ झुकर सलाम करे उनको, जिनके हिस्से मे ये मुकाम आता है !!
खुशीनसीब होते है वो लोग, जिनको देश सेवा करने का अवसर मिलता है. !!
रेल्वे स्टेशन वरती उतरल्यानंतर त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, यांनी स्वागत केले. तसेच रात्री पिंपळकोठा गावांमध्ये चामुंडा माता मंदिर संस्थान चे विश्वस्त मंडळी आणि बडगुजर समाजातील मंडळींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
तर दोन डिसेंबर सोमवार रोजी धरणगाव नाक्यापासून त्यांच्या घरापर्यंत मोठी मिरवणूक काढण्यात आली ,रस्त्या रस्त्याने रांगोळ्या काढण्यात आलेले होत्या,फुलांचा वर्षाव करण्यात आला होता ,ओपन जिप गाडीला भारतीय ध्वज तिरंगा व फुल मालांनी सजविले होते यात एरंडोल मधील बडगुजर समाजातील प्रतिष्ठित मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार, देश सेवेसाठी वाहून घेतलेले देशभक्त, माजी सैनिक या सर्वांनी हिरीरीने भाग घेतला. देशभक्तीमय अशा वातावरणात सदर मिरवणूक पार पडली. रस्त्या रस्त्याने त्यांचा सत्कार करत औक्षण करत त्यांच्या घरी त्यांचे स्वागत करण्यात आले.
लक्ष्मी नगर मध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शासनातील बांधकाम विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता श्री रमेश नारायण बडगुजर हे उपस्थित होते. तसेच श्री राजेंद्र पुंडलिक शेठ बडगुजर अंमळनेर, तसेच श्री डाॅ राहुल साळुंखे चोपडा,श्री जगदीश पुंडलिक पाटील संस्थापक महाराणा प्रतापसिंग शैक्षणिक संस्था खडकेसिम ,प्रा, डॉ, राखी पाटील मॅडम, खानदेश संरक्षक संस्था एरंडोल तालुका अध्यक्ष श्री गणेश शिंदे सर,तसेच गिरजा क्लास सेंटरचे संचालक श्री गोपाल लोटन पाटील हे यावेळेस उपस्थित होते. तसेच नवनिर्वाचित आमदार श्री गुलाबभाऊ पाटील यांचे चिरंजीव श्री प्रताप भाऊ यांनी स्वतः भाऊंच्या माध्यमातून सागर बडगुजर यांचा सत्कार केला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गजानन पाटील यांनी केले त्यात त्यांनी सागर बडगुजर यांचा जीवनपट सर्वांसमोर उलगडला. तर प्रा. डॉ. राखी पाटील मॅडम यांनी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या, सौ सरिता रघुवंशी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका यांनी मनोगतामध्ये देश सेवेचे महत्व स्पष्ट करून सांगितले, तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.श्रीराम बडगुजर सर यांनी सैनिक हे भारतासाठी किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले.
देशभक्ती देश की शान है
देश भक्तो से ही देश की मान है
हम उस देश के फूल है यारो
जिस देश का नाम हिंदुस्तान है
या कार्यक्रमामध्ये सागर बडगुजर यांचा चिरंजीव चिराग बडगुजर यांने सुद्धा आपल्या आजोबांप्रमाणे आणि वडिलांप्रमाणे आपल्या वंशातील तिसरी पिढीतून सैनिकी मध्ये ऑफिसर होण्याची इच्छा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिलिंद बडगुजर यांनी केले. सौ दिपाली बडगुजर यांनी सैनिक पत्नी म्हणून जीवन जगत असताना आलेले अनुभव कथन करत कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे डोळे पाणवले. सदर कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.
या कार्यक्रमासाठी आजी-माजी सैनिक मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक देश सेवेने प्रेरित देशभक्त असे सातशे ते आठशे लोक उपस्थित होते. यावेळेस खानदेश न्यूज चैनल चे वार्ताहर प्रवीण महाजन यांनी देशभक्तीपर स्वरचित कविता सादर करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शंभराहून अधिक लोकांनी श्री सागर बडगुजर यांचा सपत्नीक सत्कार केला.
कभी न मिटने वाला ख्वाब हो आप
सच कहू फौजी साब बेमिसाल हो आप
याचा प्रत्यय या कार्यक्रमात आला. श्री सागर बडगुजर यांनी आपल्या भाषणातून केवळ सीमेवर राहूनच देश सेवा करता येते असे नसून आपण समाज आणि गावांमध्ये सुद्धा राहून देशभक्ती करू शकतो याचे उदाहरण दिले.
सिर्फ नाम से नही दिल से देशभक्त बनो !!
वतन की खातिर हर पल कुछ खास करो !! हा संदेश दिला.
श्री सागर बडगुजर यांना पुढील आयुष्यासाठी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. त्यांनी केलेल्या देश सेवेप्रमाणेच पुढे त्यांच्या हातून समाजसेवा घडावी उपेक्षितांना मार्गदर्शन मिळावे त्यांचे आरोग्य सुदृढ राहो याच सदिच्छा
कभी थंडसे ठीठूर कर देख लेना !!
कभी तडपती धूप मे जल के देख लेना !!
कैसे होती है इफाजत मुल्क की !
कभी सरहद पर चल के देख लेना.!!
श्री सागर बडगुजर यांना सेवापुर्ती निमित्त अखिल भारतीय बडगुजर महा समिती बडगुजर युवा समिती बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
शब्दांकन व सूत्रसंचालन
प्रा.मिलिंद बडगुजर जळगाव (9421184495)
श्री राजेंद्र बडगुजर(9595597238)
श्री सागर बडगुजर (7350202050)
श्री. राजेंद्र पोपट बडगुजर मु.पो .पिंपळकोठा , हल्ली मुक्काम एरंडोल हे माजी सैनिक असून त्यांनी पंधरा वर्ष देशसेवेसाठी आपले दिले व यांचेच सुपुत्र ,
श्री. सागर राजेंद्र बडगुजर यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देश सेवा करण्याचे व्रत हाती घेतले श्री. सागर यांच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक खडतर प्रसंगाला सामोरे जात त्यांनी 21 वर्षानंतर देशसेवा करून सेवानिवृत्त झाले याप्रसंगी एका फौजीच आयुष्य कसं असतं…. किती कठीण परिस्थितीत फौजींना सामोरे जावे लागत ते सांगताना मिशन पुलवामा येथे सागर यांना पाठवले असता सागरयांच्या पत्नी सौ .दीपा सागर बडगुजर यांनी तो अनुभव सांगितला यांचे हृदयस्पर्शी मनोगत प्रत्येकाने अवश्य ऐका…👌🏻👌🏻👌🏻💐💐
Leave a Reply