समर्थ फाऊंडेशन आणि एज्यूरिक हब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यस्तरीय समाजभूषण ” पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रविवार, सकाळी १० वाजता, चौथा मजला, तृप्ती बँक्वेट (ग्लोरिया हॉल), एम.एच. हायस्कूल, तलावपाळी जवळ ,ठाणे पश्चिम येथे पार पडला.

“राज्यस्तरीय समाजभूषण ” पुरस्कार प्रदान सोहळयाचे प्रमुख पाहुणे मा. ॲड. प्रशांत कदम, अध्यक्ष, ठाणे जिल्हा न्यायालयाच्या बार असोसिएशन, ठाणे हे लाभले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ.दीपक साबळे आणि ॲड. सुनिता साबळे हे होते.

सदर समाजभूषण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील नागपूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी पनवेल ठाणे मुंबई जळगाव अशा विविध जिल्ह्यांमधील डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक समाजसेवक अशा वीस जणांची भेट निवड करण्यात आली होती. यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव प्रा. मिलिंद चींधू बडगुजर यांची निवड करण्यात आली होती. या दिमाखदार सोहळ्यामध्ये शाल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पुरस्कार विजेत्यांना देण्यात आले.
प्राध्यापक मिलिंद बडगुजर हे मूळचे चिंचोली तालुका यावल येथील रहिवासी असून धानोरा तालुका चोपडा येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भाऊसिंग पाटील ज्युनिअर कॉलेज मध्ये गेल्या 22 वर्षापासून कनिष्ठ व्याख्याता म्हणून कार्यरत आहे. सरांनी केलेल्या सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीचे मूल्यांकन होऊन यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. आपल्या शाळेमध्ये सुद्धा सर विविध उपक्रम राबवत असतात गावातील विविध उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत असतात तद्वतच समाजाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा व्याख्याते सूत्रसंचालक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण अध्यापन शैलीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये आदर्श शिक्षक बनले आहेत.

“हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून मला विविध कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मित्र मंडळी सहकारी समाज बांधव गावकरी या सर्वांचे हे यश आहे”प्रा. मिलिंद बडगुजर या निवडीसाठी त्यांचे शाळेचे चेअरमन श्री प्रदीप विष्णू महाजन श्री.बी एस महाजन सर तसेच सर्व शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सर बडगुजर प्राऊड ग्रुपचे सदस्य असून बडगुजर समाजाच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी नोंदवत असतात. नुकताच बडगुजर समाजाचा ऐतिहासिक असा पहिला युवा मेळावा झाला त्याचे सुत्रसंचलन हे सरांनी केले होते. त्यांच्या या यशाबद्दल अ. भा. बडगुजर महासमिती अ. भा. ब. स. युवा समिती व बडगुजर.इन टिमचा यांचा मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!
शब्दांकन
चेतन गोपाल पाटील भोकर
(९९७५८८६२७४)
खूप खूप अभिनंदन.