स्विफ्ट लिफ्ट मीडिया अँड टेक एलएलपी या कंपनीद्वारे संपूर्ण भारत भरातील आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांपैकी काही कंपन्यांचे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये श्री. अमोल रामलाल बडगुजर यांच्या इंटीग्रेशन विंग्स् या कंपनीची निवड करण्यात आली.

नुकताच स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया अँड टेक एलएलपीतर्फे पुणे कोथरूड येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी सिनेतारिका सौ. सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते श्री. अमोल बडगुजर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना याच वर्षी दुबई येथे सुध्दा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
श्री. अमोल बडगुजर हे आयटी इंजिनिअर आहेत. अमोल बडगुजर यांचा प्रवास कर्मचारी ते उद्योजक (Employee to An Entrepreneur) हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. फारच कमी वयामध्ये आयटी क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केले. आज देशात आणि विदेशात त्यांनी आपला कामकाज पसरविले आहे. आता सध्या त्यांची पुणे येथे हेडकॉटर तर दुबई आणि डेलावेअर यूएसए येथे ऑफिसेस आहेत.

दुबई येथे पुरस्कार भेटल्यानंतर मिडीयावर इंटरव्ह्यू देतांना
आयटी क्षेत्रामध्ये अमोल यांनी आपली एक नवी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल बडगुजर डॉट इन टीम व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती तर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

Leave a Reply