
अमळनेर : दिनांक 25/08/2024 वार : रविवार रोजी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत शिक्षण समितीने अमळनेर येथील बडगुजर समाज मंगलकार्यालय येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बडगुजर समाजाची कुलदैवत आई चामुंडा मातेच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष : श्री. सुरेश शिवराम महाले हे होते तसेच महासमिती उपाध्यक्ष : श्री. दिलीप राघो बडगुजर, महासमिती सचिव : श्री. हिरालाल रघुनाथ बडगुजर, महासमिती माजी अध्यक्ष श्री. उमेश हिरालाल करोडपती, श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, मा. सचिव महासमिती, प्रा. ईश्वर बडगुजर सर, संपादक, समाजदूत, अखिल भारतीय शिक्षण समिती प्रमुख श्री. प्रकाश धुडकू बडगुजर ( पी. डी. बडगुजर सर) समिती उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर नथ्थ बडगुजर समिती सचिव श्री. राजेंद्र महादेव पवार, सौ. राजश्रीताई बडगुजर ( पुणे ) You Tube चॅनल प्रमुख, बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांवच्या अध्यक्षा सौ. ज्योती ताई बडगुजर, वधूवर समिती प्रमुख श्री. लिलाधर बडगुजर, युवक समिती प्रमुख श्री. लोकेश कोतवाल, युवक समिती सचिव श्री. चंद्रकांत बडगुजर सर बडगुजर समाज ओबीसी समिती उपप्रमुख श्री. रविंद्र बडगुजर, बडगुजर समाज पंच मंडळ अध्यक्ष : व सर्व संचालक मंडळ तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत शिक्षण समितीचे संचालक मंडळ व विविध समितीचे मान्यवर उपस्थित होते, उपस्थित सर्व मान्यवरांचा शब्द सुमनांनी स्वागत करून सत्कार करण्यात आला, यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आई चामुंडा माता फोटो, स्कूल बॅग, ट्रॉफी, प्रमाणपत्र, गुलाबाचे फुल देऊन गौरविण्यात आले, यावेळी विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमा बाबत मनोगत व्यक्त करतांना सांगितले की असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना अजून जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतात तसेच आम्हा पालकांनाही आपल्या मुलाचा सत्कार होतांना डोळे पाणावतात, यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद दिसत होता.

कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुणे येथील प्रसिद्ध युट्यूबर सौ. राजश्री ताई बडगुजर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की बदलत्या ध्येय धोरणांच्या काळात पारंपरिक ज्ञानाची व नोकरीची क्षेत्र पुरेसी पडणारी नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता नवनव्या ज्ञान क्षेत्रांचा शोध घेऊन प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. त्यानंतर युवा समिती सचिव चंद्रकांत बडगुजर सर यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण अशा युवा मेळावा विषयी मार्गदर्शन केले. सोबत युवा समिती प्रमुख श्री. लोकेश कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणानंतर नोकरी कशी मिळवावी यासाठी मार्गदर्शन केले तसेच युवकांना युवा मेळावा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सचिव व प्रमुख यांच्या कडून करण्यात आले. नंतर शिरपूर येथील डॉ. सौ. वृषाली बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जे स्वप्न बघतील तेच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. निवडलेल्या मार्गावर 100 टक्के प्रेम करा व त्या दृष्टीने प्रयत्न करा. तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेच्छा व प्रेरणा मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात शिक्षण समिती मार्फत एकूण 110 विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात आला तसेच विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर सर, मा. सचिव महासमिती व प्रा. ईश्वर बडगुजर सर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात महासमिती अध्यक्ष विद्यार्थी व पालक, समाज बांधव यांना संबोधित करताना म्हणाले की मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्व असून ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताकदीने उभे राहून जिद्दीने अभ्यास करावा, उद्याचा दिवस सोन्याचा करायचा असेल तर आजच कष्ट करा. या कार्यक्रमात अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती अध्यक्ष श्री. लोकेश बडगुजर यांनी समितीच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले , त्यात समिती संघटक पदी श्री. विनोद श्रीराम मोहकर धरणगांव, समिती प्रसिद्धी प्रमुख श्री. दिनेश बारकु बडगुजर पारोळा यांची नियुक्ती करण्यात आली.


कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन भाषणातून शिक्षण समिती प्रमुख श्री. पी. डी. बडगुजर सर म्हटले की, जग अतिशय वेगाने बदलत आहे. सध्या एका बटनावर सगळी माहिती उपलब्ध होत आहे. शिक्षणातून कौशल्य मिळाले नाही तर शिक्षण व्यर्थ ठरते, अपयशावर मात करुन पुढे जाण्याची तयारी ठेवा. विपरीत परिस्थितीमध्ये निराश होता त्याला तोंड कसे देता येईल याचा अभ्यास करा, तसेच पालकांनी त्यांच्या पंखाना बळ द्यावे व त्यांच्यावर विश्वास ठेवावा तरच विद्यार्थी यांना जागतिक स्पर्धेत टिकता येईल, असे मार्गदर्शन करून उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक व समाज बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमा नंतर बडगुजर समाज पंच मंडळ अमळनेर यांनी सुरूची भोजनाची व्यवस्था केली होती, सर्वांन भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली
Leave a Reply