धरणगांव वहन महोत्सव सन २०२३-२०२४ साजरा – श्री. बापु पुरुषोत्तम बडगुजर, धरणगांव

श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ धरणगाव, च्या वतीने धरणगाव परिसरातील अंदाजे १२५ वर्षाची परंपरेने, प्रथेनुसार अखंडपणे आनंदी वातावरणात वहन उत्सव हा उत्स्फूर्तपणे साजरा होतो. धरणगांव भागातील एकमेव श्री बालाजी वाहन व रथोत्सव शुभारंभ हा दिनांक १५/१०/२०२३ वार रविवार पासून सुरूवात झाली व सांगता ही २०/१०/२०२३ वार रविवार रोजी झाली. महोत्सव पूर्वीच्या काळात अनेक संकट आली पण श्री च्या कृपेने सदर महोत्सव हा अखंड पणे साजरा होत आहे. या प्रति वर्षीप्रमाणे हा महोत्सव साजरा होत आहे तरी शोभा यात्रेस आपण सहकुटुंब, इष्टमित्रसह उपस्थित राहून शोभा वाढवली यावेळेस धरणगांव पंच मंडळ चे सर्व पदाधिकारी, धरणगांव बडगुजर बंधु व भगिनी उपस्थित होते.
अश्विन शु. प्रतिपदा १, दि. १५/१०/२०२३ वार रविवार रोजी ध्वजावहन ( श्री गजानन ) वहन हे धरणगांव येथील श्री. बापु पुरुषोत्तम बडगुजर हे श्री. गजाननाचे वहनाचा मान मिळवला. अतिशय आनंदमय वातावरण वाजतगाजत लेझीम पथक सह उत्साह हा द्विगुणीत साजरा झाला. नंतर धरणी चौक येथे प्रत्येक लेझीम पथकास मान्यवरांच्या हस्ते ११००/- रुपये हे देण्यात आले.

https://youtube.com/shorts/wG1k-QjX2n0?si=f4OKBn2HZZQ1qp9t

https://youtube.com/shorts/ENju6-jtIh0?si=sEWpM2SKXkYhExtg

https://youtube.com/shorts/ENju6-jtIh0?si=sEWpM2SKXkYhExtg

https://youtube.com/shorts/I19oE-Aq3tk?si=2T0sRM1h20ZRstsq

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*