अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
शिरपूर येथे दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या कार्यकारिणी सभा संपन्न झाली. या सभेमध्ये महासमितीचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. आनंदा धोंडू सुर्यवंशी यांनी राजीनामा दिला. व पुढील नविन अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. अगदी आनंदायी व खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. या सभे मध्ये अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आणि बडगुजर विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधुवर मेळावा आयोजन विषयक चर्चा करण्यात आली. तसेच ओबीसी समिती, शिक्षण समिती यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
ओबीसी विषयक विशेष कार्य करणाऱ्या सौ. स्नेहल अभिषेक बडगुजर यांचा अभिनंदनाचा ठराव एकमताने करण्यात आला.
श्री. सुरेश शिवराम महाले हे भुसावळ येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून प्रसिद्ध उद्योजक आहेत. तसेच समाज कार्याचा प्रदीर्घ अनुभव असून सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात यासोबतच ते अ. भा. ब. स. महासमिती अंतर्गत सलोखा समिती प्रमुख असून अनेक कौटुंबिक वाद त्यांनी सामंज्यसाने सोडविले असून बरेचसे कुटुंब सौख्याने नांदत आहेत. असा दिर्घ अनुभवी व्यक्ती समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. सुरेश शिवराम महाले यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. सुरेश शिवराम महाले – 9422773849
Congratulations to Shri.Suresh Mahaleji🌺🌺🎉🎉👍