नंदुरबार पोलिस हेड कांस्टेबल श्रीमती राखी अनिल बडगूजर यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत ईराणी टोळीने चोरलेले २३ तोळे सोने केले हस्तगत – श्री. अनिल बडगुजर, खेतिया

नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथील कार्यरत पुलिस हेड कांस्टेबल श्रीमती राखी अनिल बडगूजर यानी पुलिस विभाग मध्ये केलेली कामगिरी बद्दल पुलिस स्टेशन नंदुरबार येथे दिनांक 28.10.2023 रोज़ी सत्कार करण्यात आला.

ईराणी टोळी कडून नंदुरबार जिल्हा अभिलेखावरील ०५ जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) व २ पोलीस बजावणीचे असे ७ गुन्हे उघड करून आरोपी कडून तब्बल ८ लाख ७३ हजार किंमतीचे २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करून तसेच इतर जिल्ह्यातील एकूण २० गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. श्री. अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्रीमती राखी अनिल बडगुजर यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्रीमती राखी अनिल बडगुजर यांनी पोलीस दलात केलेल्या विशेष कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत असून बडगुजर समाजासाठी अभिमानाची बाब आहे. श्रीमती राखी यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्रीमती राखी अनिल बडगुजर -9172650597

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*