बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे आयोजित “सोयरीक पूर्व आणि विवाह तर येणाऱ्या समस्यांवर प्रकाश ज्योत टाकणारा आगळावेगळा वार्षिक स्नेह समाज मेळावा 2023” दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते 2.30 या वेळेत “काशीधाम मंगल कार्यालय”, चिंचवड, पुणे येथे घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सामाजिक प्रबोधनकार सौ शारदाताई मुंडे यांचे विवाह संस्थेवर परखड विचारांचे भाषण होणार आहे… तसेच त्यानंतर पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक आणि बक्षीस वाटप देखील होणार आहे. पुणे व परिसरातील समाज बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply