कुर्हे पानाचे ह. मु. पुणे येथील श्री. अमोल रामलाल बडगुजर यांचे आय. टी. कंपनीच्या नविन ऑफिसचे उद्घाटन सोहळा संपन्न

कुर्हे पानाचे येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. रामलाल गोविंदा बडगुजर यांचे सुपुत्र श्री. अमोल रामलाल बडगुजर यांच्या पुणे येथे असलेल्या Integrationwings या कंपनीचे नविन ऑफिसचे सुरतवाला मार्क प्लाझा, हिंजवडी येथे नुकताच शुभारंभ करण्यात आला.

सदरील कंपनी मध्ये विविध आय. टी. सर्विसेस आणि संबंधित प्रोडक्ट चा व्यवसाय केला जातो. या ऑफिस मध्ये ४०+ पेक्षा जास्त स्टाफ असून १० पेक्षा जास्त क्लायंटस् UK, US & Dubai या विविध देशातील आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये सुरू केलेल्या Integrationwings च्या या दुसऱ्या ऑफिसचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

कंपनीचे संचालक श्री. अमोल बडगुजर हे कुशल संगणक तज्ञ असून अतिशय हुशार व हुरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कंपनीचा विस्तार करत आहेत. बडगुजर समाजातील एक उभरते युवा उद्योजक म्हणून श्री. अमोल बडगुजर हे आय टी क्षेत्रात आपली छबी निर्माण करीत आहेत.

बडगुजर. इन टिम तर्फे कंपनीचे संचालक श्री. अमोल रामलाल बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*