समाजातील काही व्यक्ती अगदी लहान वयातच खूप उंच भरारी घेत असतात. त्यापैकी मुळ कढोली गावचे डॉ. शामकांत भास्कर बडगुजर हे एक होय.
डॉ. शामकांत भास्कर बडगुजर यांच्या वडीलांचे पुर्ण नाव श्री. भास्कर हिरामण बडगुजर तर आईचे नाव सौ. सुनंदा भास्कर बडगुजर आहे.

इ. १०वी. व १२वी. चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रसायन शास्त्र या विषयातून पदवी संपादन केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून गुणवत्ता यादीतून उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्राप्त केला. तसेच Biotechnology या विषयातून त्यांनी एम. एस. सी. (M. Sc.) संपादन केली. पदविकेत देखील ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ टाकून गुणवत्ता यादीतून 4 थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
यानंतर ते 2005 ते 2013 या काळात असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते एम. जे. कॉलेज जळगाव, आर. सी. पटेल शिरपुर, इंजिनिअरिंग कॉलेज बांभोरी येथे नोकरी केली. या काळात Head Of Department म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. संशोधनाची आवड – पीएचडी प्रवेशासाठी पेट परीक्षा देणे अनिवार्य होते. 2005 मध्ये पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या पेट परीक्षेचा लाइफ सायन्स या विषयातून ११०० विद्यार्थ्यांपैकी डॉ. शामकांत हे एकमेव पास झाले.
सप्टेंबर 2007 मध्ये पीएचडी ला प्रवेश घेऊन त्यांनी उत्तुंग यश गाठले. या काळात त्यांचे 20 रिसर्च पेपर प्रकाशित झाले.

जुलै 2011 मध्ये उमवि चे कुलगुरू डॉ. के. बी. पाटील सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कारण की, वयाच्या 27व्या वर्षी म्हणजे अत्यंत कमी वयात त्यांनी PhD मिळविली होती.
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची पुढील शिक्षणासाठी (पोस्ट डॉक्टरेटसाठी) अमेरिकेला जाणे आवश्यक होते. ऑक्टोबर 2011 मध्ये समाजाच्या मदतीने ते अमेरिकेला शिक्षणासाठी गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते भारतात परतले तर समाजाचे पैसे त्यांनी परत केले. अमेरिकेतून परतल्यानंतर चोपडा येथे समाजाच्या कार्यक्रमात अ. भा. बडगुजर समाज महासमिती द्वारा त्यांना चोपडा येथील आमदार श्री. जगदीश वळवी यांच्या हस्ते सत्कार करून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्यात आला.


संशोधनाची आवड असल्यामुळे त्यांनी पुढील शिक्षणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, न्यू दिल्ली येथे अर्ज केला. संपूर्ण भारतातून फक्त बारा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात महाराष्ट्राचे केवळ दोन विद्यार्थी होते. त्यापैकी एक आपले डॉक्टर शामकांत. NIRRH, परेल मुंबई येथील केंद्र सरकारच्या शास्त्रज्ञासोबत मोलाचे संशोधन त्यांनी केले. येथील संशोधनामुळे ज्या स्त्रियांना डिलेव्हरी नंतर कमी दुध येते त्यासाठी Galactagogue नावाचे औषध तयार केले. आणि ते बाजारात केंद्र सरकारच्या मदतीने आणले. या औषधाच्या सेवनाने दुधाचे प्रमाण वाढते. या विषयावर 4 रिसर्च पेपर त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.
सन 2015 सालापासून त्यांनी इंडस्ट्री क्षेत्रात नोकरी करण्याचे ठरविले. त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना भरपूर प्रमोशन मिळाले. मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि आज ते सिनियर मॅनेजर व हेड ऑफ आर & डी डिपारमेंट आहे.
मार्च 2018 साली मुंबई विद्यापीठाने त्यांना PhD Guide म्हणून मान्यता दिली. ते समाजातील अत्यंत कमी वयात PhD मिळवणारे आणि PhD Guide होणारे एकमेव व्यक्ती आहेत. सात वर्षे Teaching Experience व चार वर्षे Industrial Experience असा दोन्ही क्षेत्रातला अनुभव त्यांना आहे.

? आज पर्यंत 35 शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहे.
? त्यांनी 21 राष्ट्रीय conference मध्ये रिसर्च पेपर सादर केले आहे.

डॉ. शामकांत सरांचा यशोगाथेचा प्रवास समाजातील तरुणांपुढे उद्बोधनासाठी यावा हीच इच्छा…
डॉ. शामकांत सर आपणांस भावी वाटचालीस आमच्या टीम तर्फे खुप खुप शुभेच्छा.
संकलन – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे.
शुभेच्छूक –
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप
हार्दिक अभिनंदन डाॕ.शामकांत भास्कर बडगुजरसर,
घरची गरिबीची परिस्थिती असतांना उच्च शिक्षणाचे ध्येयाने अथक प्रयत्नांची शिकस्त करून बायोटेक्नाॕलाॕजी सारख्या कठीण विषयात पी.एच् डी. (डाॕक्टरेट)डिग्री संपादन करणेची असाध्य गोष्ट साधली. तसेंच आंतरराष्ट्रीय स्तरावर ३५ शोध निबंध व २१ नॕशनल काॕनफरन्समध्ये रिसर्च पेपर सादर केलेत.आपल्या या यथोगाथेचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच!आपल्या यशोगाथेचा समाजातील युवायुवतींनी आदर्श घ्यावा असे याप्रसंगी नमूद करावेसे वाटते.
सरgee भविष्यांत आपल्या शुभ करकमलाव्दारे समाजासाठी भरीव कार्य घडो अश्या हार्दिक शुभेच्छाll
*All the BEST Dr.Shamkant Badgujar*
Dr.Shyamkant Badguhar, I am really overwhelmed going through your successful story taking Badgujars to beyond sky limit high. I really appreciate Badgujar Samaj who helped you during your bad phase of life and also yourself being the no.1 honest to refund the payable dues to them. Many people forget the indebtness towards the helping hands. My sincere congratulations on your high achievement. Pl help the Samaj in the form of financial or in any form as there are Samaj Bhavans in dilapidated condition and renovation is required. There is open land and we can construct Mangal Karyalaya for Samaj’s benefit. Pl come forward, we need people like you to encourage to achieve the goals. There is lethargic attitude of not helping the Mandals to complete the jobs undertaken, in certain rich and highly paid professionals. Mumbai Mandal is transperant in leading the projects still find difficulties to march towards the remarkable projects.
It was an outstanding journey till now with highs and lows. You are an ideal example for today’s generation who thrived with minimal resources and achieved great success in your field.
Congratulations for your achievements and best luck for future journey.
You are there great role model for the society.
*एक समाज एक व्यासपीठ*
डॉ.शामकातसरआपल्या या यथोगाथेचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच!आपल्या यशोगाथेचा समाजातील युवायुवतींनी आदर्श घ्यावा असे वाटते.
भविष्यात आपल्या हातून समाजासाठी भरीव कार्य घडो अश्या शुभेच्छाll
*वेब पोर्टल वर यशोगाथा सदर* फारच छान
*एक समाज एक व्यासपीठ*
डॉ.शामकांत बडगुजर सर प्रथमता आपले मनःपूर्वक अभिनंदन.आपण समाजाचे भूषण आहात. आपल्या ज्ञानाचा उपयोग समस्त मानव जातीस व्हावा अशी प्रभू चरणी प्रार्थना. आपणास पुढील कार्यास मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. . ! ?
Njoy. . ! ?
Congratulations Dr.shamkant Bhaskar Badgujar.for your hard efforts.
Dr.shamkant Sir yani mahan molachi kamgiri keli ani tyani samajapudhe you yuvak yuvati yanchyasathi aadarsh nirman kela mhnun tyanche faar kauutuk karavese vatat ahe critical situation vr maat krun tyani ek samajapudhe example dile ahe. ..so best wishes for your future. …
A heartiest congratulations sir for your great Achievements, It is a great thing that we have received your guidance for some time. Very well wishes for your bright future.
Great Achievements in very few time, God may bless you Shamkant Sir!!!
Congratulation for this Great Achievement Dr.Shamkant, only say you done very good job and everyone should be learn from you and very well wishes for your future.