?”भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” ?
दि.20/3/2019 रोजी कुऱ्हे येथे रंगपंचमी साजरी करण्यात आली. दर पौर्णिमेला होणाऱ्या मिटींग मध्ये या महिन्यात रंगांची उधळण करण्यात आली. गावातील बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. सर्व महिलांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली.
यावेळी भुसावळ येथील सौ.लता बडगुजर, सौ. सविता पंकज बडगुजर यांना आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी रंगांची उधळण करण्यात आली.
तसेच गावातील नवनिर्वाचित महिला मंडळ सदस्य कार्यकारणी विस्तार करणे, महिला बचत गट स्थापन करणे, समाजातील इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेस गावातील सौ. आरती बडगुजर, सौ. संगिता कोतवाल, विद्या बडगुजर, साधना कोतवाल, सौ. वैशाली बडगुजर, सौ. मंदा बडगुजर इ. महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply