धुळे-: भारत अनेक जाती धर्म समाजात विभागलेला देश आहे. प्रत्येक समाजाचे रुढी, पंरपंरा, चाली-रिती रिवाजात भिन्नता आहे. यातील काही परंपरा समाजाच्या विकासाला अडसर ठरु पाहत आहेत. यामुळे समाजाची प्रगती खुंटण्यास हातभार लागत आहे. समाजातील अनेक समाजसुधारक , बौध्दीक विचाखंत या श्रृंखलेला सामाजिक चौकटीचे भान ठेवुन तोडण्याचे प्रयत्त करीत आहेत. यात जनजागृतीच्या माध्यमातुन,शिबीरातुन अथवा मेळाव्यातुन असे कार्य पार पाडीत आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सौ.रत्नाताई बडगुजर यांचे नांव घेता येईल.
सौ.रत्नाताई बडगुजर यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा हा आपले सासरे श्री. हिरालालशेठ बडगुजर व पती श्री. सुभाषशेठ बडगुजर यांच्याकडुन परंपरेने मिळाला. सासरे हिरालालशेठ यांना देखील समाजाप्रती असलेली कृतज्ञनता नेहमी आपल्या अंगात ठेवुन समाजापुढे सदैव धडपडणारी व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा होती. हे गुण अंगी बाळवुन आपण देखील समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवुन सौ.रत्नाताई बडगुजर यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. शिक्षण एस.एस.सी पर्यंत होवुन कौटुंबिक प्रंपंच साभाळुन समाजाला आपल्या ज्ञानाचा फायदा कसा होईल. व समाजामध्ये असलेली परंपरागत रुढी परंपरा यांना छेद देवुन आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचा पती श्री.सुभाष बडगुजर व मुलगा श्री.योगेश बडगुजर यांच्या सहकार्याने सौ.रत्नाताई प्रयत्न करित आहे.
सौ.रत्नाताई बडगुजर सामाजिक कार्यात गेली १७ वर्षापासुन कार्यरत आहे. या कार्यातुन शोषित व वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेषतः महिलां वर्गाकरिता शासनामार्फत राबविण्यांत येत असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यांचा प्रयत्न सातत्याने महिला शिबीरे, मेळावे घेवुन करण्यांत येत आहे.
या १७ वर्षाच्या कार्यात सौ.रत्नाताई बडगुजर यांनी खालील कार्य करित आहे. यात प्रामुख्याने-:
१)सामाजिक कार्य
२)आरोग्यविषयक कार्ये
३)शैक्षणिक कार्ये
४)कायदेविषयक कार्य
५)धार्मिक कार्य
६सांस्कृतिक कार्य
७)स्वयंरोजगार कार्ये
८)इतर शासकीय
योजना विषयक कार्ये
इ.कार्याच्या माध्यमातुन
सौ.रत्नाताई आपल्या
कार्याची छाप समाजात पाडीत आहेत.
परंतु यासोबत जनसामान्यांत
देखील नावलौकिक मिळाविलेला आहे.
सौ.रत्नाताई बडगुजरांनी जनकल्याण बहुउदेशीय सेवासंस्था, रत्नमाला महिला विकास फांऊडेशन या संस्थद्वारे विविध समाजपयोगी कल्याणकारी योजनेच्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याचे कार्ये करित आहे. सामाजात सामान्य माणसांवर होणा-या अन्यायविरुध्द कायदयाच्या माध्यमातुन वाचा फोडण्याचे कार्य अखिल भारतीय मानवी हक्क संघटनेच्या वतीने करीत आहे. या संघटनेद्वारे कायदयाद्वारे बळी ठरलेले, अन्यायग्रस्त नागरिकांना त्यांचे हक्क मिळवुन देण्यांचा प्रयत्न सौ.रत्नाताई करित आहे. समाजात आजही अनेक स्त्रीया हुंडाबळी, अत्याचाराच्या बळी ठरत आहे. त्यांची स्त्री अत्याचार सुरक्षा समिती समोर मुद्देसुद बाजु मांडुन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यांत येत आहे. तसेच शासकीय अशासकीय संस्थेत कार्यरत महिला कर्मचारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लैगिक अत्याचाराचे बळी ठरु नये. याकरिता शासकीय महिला लैगिक अन्याय अत्याचार निवारण समिती द्वारे पाठपुरावा करुन महिला कर्मचारी मध्ये आपल्या कामाचा दबदबा सौ.रत्नाताई बडगुजर यांनी केलेला आहे. तसेच मनमाड इंदौर रेल्वेमार्ग याच्या यशस्वी प्रकल्पात सौ.रत्नाताई बडगुजर यांचा महत्वपुर्ण वाटा आहे. याकरिता भारतीय रेल्वे सल्लागार मंडळावर नियुक्ती होवुन खांन्देश विभागात चांगले हितकारी प्रकल्प मंजुर करुन घेण्याचे श्रेय सौ.रत्नाताई बडगुजर यांना देण्यांत येत आहे.
सामाजिक कार्याचा वारसा अथवा कार्ये सौ.र्त्नाताई बडगुजर यांचे भव्यदिव्य असले तरी राजकीय कार्याला देखील स्पर्श करण्यांत| आलेला आहे. सर्वप्रथम आदरणीय मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होवुन शिवसेनेत महिला संघटीका पदी कार्यभार साभांळला. यानंतर मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिला जिल्हाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यांत आली. यानंतर मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचाराने प्रभावित होवुन भारतीय जनता पार्टीत सौ.रत्नाताई बडगुजर यांनी प्रवेश केला. पक्षाने देखील सामाजिक व राजकीय पार्श्वभुमीचा विचार करुन भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षापदी निवड केली आहे. सौ.रत्नाताई बडगुजर आजदेखील पक्षाचे कामकाज साभांळत आहे.
राजकीय व सामाजिक कार्याचा प्रवासात सौ.रत्नाताईनी समतोलपणा राखत तो कधीही ढळु दिला नाही. विखुरलेला समाजाला एकसंघीय पध्दतीने बांधण्यासाठी मध्यप्रदेश,राजस्थान, गुजराथ व संपुर्ण महाराष्ट्र राज्यात दौरे करुन समाजातील लोकांची, समाजसेवक,व्यापारी , नोकरदार वर्गाची गाठीभेटी घेवुन समाजाचा पहिला महिला महामेळावा घेण्याचा संकल्प सौ.रत्नाताई बोलुन प्रत्यक्ष पारोळा येथे साकार करण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला. याकरिता समाजातील प्रतिष्ठीत लोकांची साथ सौ.रत्नाताई बडगुजर यांना मिळाली. या मेळाव्यात तज्ञ मान्यवरांना बोलावुन उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यांत आले. तसेच भविष्यात बडगुजर समाज विकासाच्या दृष्टीने एकसंघीय कसा राहील याकरिता अजुन कोणते प्रयत्न करता येतील याचे मेळाव्यात बहुमताने ठराव करण्यांत आला आहे.
सौ.रत्नाताई बडगुजर दिवसरात्र समाजाच्या उन्नतीकरिता झटत आहे. यात कुटुंबाची व सासरकडील लोकाची त्यांच्या कार्याला बहुमोल साथ मिळत आहे. सौ. रत्नाताई बडगुजर समाजाप्रती अवलंबविलेला मार्गाला सदैव यश प्रात्त होवो अशी प्रार्थना करुया !
जयहिंद !
जय महाराष्ट्र !!


Leave a Reply