सकाळी आई ताटामधे तांदूळ घेऊन निवडायला बसयच्या, आणि निवडणं झालं की थोडे तांदूळ त्या चिमण्या समोर टाकायच्या, बघता बघता एक, दोन पुन्हा पाचसहा आणि आता तर १०० च्या वरे चिमण्या आमच्या वाड्यात घर करून आहे, त्या चिमण्यासोबर सांळूंखी, कबुतरे व्हल, पोपट व इतर दुसरे खूप पक्षी येताता. दाणे खातात खेळतात, बागडतात, मस्ती , धिंगाणा ब किलबिलाट करतात खूप छान वाटते ते पाहून व ऐकून,
थंडीचे दिवस, सकाळचं कोवळं उन्हं, आणि त्या उन्हात चिमण्या येऊन ते तांदूळाचे दाणे टिपायच्या. ती भुरकट रंगाची चिमणी हल्ली फार कमी दिसते, चिमणी हा एकाच जोडीदारासोबत राहणारा पक्षी आहे, चिमणा घर बांधतो, घरटी बांधतो, मग चिमणी त्यात अंडी घालते.
पूर्वी आई लहान बाळाला मांडीवर घेऊन कविता म्हणायची, चिऊ ये, काऊ ये, दाणा खा………
पाणी पी भूर…. उडून जा.
त्यातली खरी खरी चिऊ दाखवायला तरी शिल्लक राहिली तर बरं, कारण सिमेंट बांधकामाच्या या उंच इमारतीच्या जंगलात त्यांना घरटी बांधता येत नाही, हवामान देखील तसे पुरक नसते, प्रर्दुषण खूपच झाले आहे.
आजकाल हा पक्षी फारच दिसणे तर फारच दुर्मिळ झालय . स्पेशली मुंबई व इत मोठी मोठी शहरे तर फक्त कावळे आणि कबुतरंच दिसतात, चिमणी कधीतरी चुकून एखाद्या वेळेस दिसली तर नशिब म्हणायची वेळ आलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे शहरं म्हणजे नुसतं कॉंक्रीटचं जंगल झालंय. चिमण्यांना आपलं घरटं बांधायला झाडंच शिल्लक ठेवलेली नाहीत आपण . हीच परिस्थिती लहान शहरातून पण दिसून येते. घरामधे पण कचरा होतो म्हणुन लोकं पक्षांना घरटी बांधू देत नाहीत. तर काही पक्षी मित्र त्यांच्यासाठी घरटेही बाधंताना दिसता. पक्षी पोपट इत्यादी बंधीस्त पाळण्याची गरज नाही त्यांना तुम्ही दाणे टाका घरात गच्चीवर, खिडकीत ग्यालेरीत वगैरे ते पक्षी तुम्ही पाळल्यासारखे जवळ येऊन खातात.
आज जागतिक चिमणी दिवस आहे संकल्प करूयात की चिमण्यांना आपण सर्व अभयदान, जीवनदान देऊ.
जागतिक चिमणी दिवसाच्या
हर्दिक शुभेच्छा …….
लेखन – श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू

Leave a Reply