समाजातील महिलांसाठी महिला दिन विशेष सप्ताह वेगळ्या पद्धतीने आयोजन – वेब पोर्टल टिम कडून

www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

नमस्कार ??????

महिला दिन विशेष सप्ताह –
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे गतवर्षी प्रमाणेच आयोजित करीत आहोत …

आम्ही आपल्या वेब पोर्टल ( www.badgujar.in ) टिम कडून महिलांसाठी हा आठवडा नविन पध्दतीने साजरा करायचे ठरविले आहे…

आपल्या समाजातील महिला भगिनी जर कुठल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल, प्राविण्य मिळवले असेल, काही कलाकृती, शैक्षणिक क्षेत्रातील, पाककला विषयक लिखाण, कविता आमच्याकडे पाठवू शकता.

तसेच आपल्या मैत्रिणींसोबत सेल्फी घेऊन त्याविषयी आपला मेसेज आपण आम्हाला पाठवू शकता. रोज एक सेल्फी वेब पोर्टल वर टाकण्यात येईल.

तसेच पुरुष सुध्दा आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण स्त्री – बहिण, आई, शिक्षिका, मुलगी, अर्धांगिनी विषयीचे मत आम्हास पाठवावे आम्ही त्यांची माहिती वेब पोर्टल वर अपलोड करण्यात येईल.
माहिती ही खाली दिलेल्या मो. नंबरवर व्हाटस् अॅप वर पाठवावी किंवा badgujarsproud@gmail.com या वर ईमेलने पाठवावी.

हा उपक्रम यावर्षी औरंगाबाद समाज मंडळाच्या आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आणि बडगुजर वेब पोर्टल प्रतिनिधी
सौ. भावनाताई बडगुजर, औरंगाबाद – 9834183939. यांच्या सहकार्याने राबवित आहोत. तरी सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद.

?जय बडगुजर सेना ?

नोट – महिला दिन विशेष सप्ताह साठी लेख पाठविण्याची अंतिम तारीख १७-३-१९. त्याआधी आपण लेख पाठवावे.

धन्यवाद.
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*