
सौ. हर्षाताई यांचा जन्म, 15 सप्टेंबर 1972 ला. बुहारी, जिल्हा सुरत, गुजरात या गावी पुनमचंद गोविंदा जाधव व सुमनबाई पुनमचंद जाधव या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
पाच बहिणी आणि एक भाऊ असे हे कुटुंब. वडील पोलिस विभागात जमादार म्हणून कार्यरत होते. लहान भाऊ संजय पुनमचंद जाधव आता सुरत पोलीस डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
22 मे 1991 ला सूरत येथे हर्षाताई यांचा विवाह श्री. सुधाकर भिका बडगुजर मूळचे भोकरकर यांच्यासोबत थाटामाटात झाला आणि विवाहानंतर त्या संपूर्णपणे नाशिककर झाल्या.
माननीय नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या निवडणुकीच्या प्रचारातील सोशल लाइफ हर्षाताई एकदम जवळून पाहत होत्या.
राजकारण आणि समाजकारण यांच्या घरातच आहे. त्यातील कष्ट आणि सतत कार्यमग्न रहायची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली. त्यातून साकारलेल्या कारकीर्द किती यशस्वी ठरते याचं मूर्तीमंत उदाहरण त्यांच्या घरातच आहे.
मृदू स्वभाव, स्पष्ट मत मांडण्याची कला, कष्ट घेण्याची तयारी, प्रशासकीय कामाची जाण यामुळे घरातच एक मोठी संधी राजकारण आणि समाजकारण क्षेत्रात काम करण्याच्या रूपाने चालून आली. एक आव्हान म्हणून त्यांनी ती स्वीकारली आणि त्यासाठी त्या पूर्णपणे कार्यरत आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 25 मधील, शिवसेनेकडून उमेदवारी करताना सौ. हर्षाताई बडगुजर यांनी सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजय पटकावला. अनेकांना काठावर उत्तीर्ण होण्यासाठी अक्षरशः झगडावे लागत असताना महापालिका निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे तब्बल 17 हजार 459 मते मिळवून शिवसेनेच्या सौ. हर्षाताई
यांनी एकतर्फी विजय प्राप्त केला.
सर्वाधिक म्हणजे तब्बल 14 हजार मतांच्या फरकाने विजयी होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला.
महत्वाच्या निर्णयांमध्ये पतीची आणि मुलांच्या ( दिपक व मयूर ) मिळणारी साथीच्या जोरावर प्रभागाच्या आणि बडगुजर समाजाच्या विकासाचे ध्येय निश्चित करून जिद्दीने त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झपाटून कामाला लागणे हा त्यांच्या स्वभावच बनला आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रत्येक संधी साधतानाच आलेल्या प्रत्येक अडचणीचा समोर जाण्याचा त्यांचा स्वभाव बनला आहे.
कर्तुत्वाला अध्यात्माची जोड असणाऱ्या हर्षाताई “मी जे काही आहे, ते श्री स्वामी समर्थ यांच्या कृपादृष्टी मुळे.” हे ठामपणे मान्य करतात.
श्री स्वामी समर्थांची पालखी सोहळा, साई भक्तांची पदयात्रा, दशमा देवीची स्थापना आणि उपासना, श्रीगणेशाची स्थापना उपासना, नवरात्रीत दुर्गा देवीची स्थापना आणि मनोभावे पूजा अर्चा त्या प्रत्येक वर्षी न चुकता करतात.
दर आठवड्याला विविध समाजोपयोगी उपक्रम, दर मंगळवारी शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्यासाठी सौ. हर्षाताई प्रयत्नशील असतात.
नाशिक महानगरपालिकेत सिडको विभागात नेतृत्व सिद्ध करताना सौ. हर्षाताई यांनी सिडको प्रभाग सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
महिला रोजगार आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर दरवर्षी आयोजित केली जाते. शिबिरात शून्यातून जग निर्माण करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन सौ. हर्षाताई कडून प्रोत्साहन दिले जाते.
राजकीय पार्श्वभूमी आणि श्रीमंती असली तरी एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे कारकीर्द घडवण्यासाठी मिळालेले स्वातंत्र्य, मार्गदर्शन आणि पाठिंबा हा त्यांच्या वाटचालीत तितकाच महत्त्वाचा ठरला आहे.
एक गृहिणी, दोन मुलांची आई या भूमिकाही त्या यशस्वीपणे आणि तितक्याच ताकदीने पार पाडत आहेत आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी जिद्दही त्यातून निर्माण होत आहे.
अश्या निगर्वी प्रेमळ, स्मितहास्य, कर्तबगार व ध्येयवादी आदर्श नगरसेविका सौ. हर्षाताई बडगुजर यांना मानाचा मुजरा. सुखी व निरोगी आयुष्यासाठी, समाजकार्यासाठी आई चामुंडा माता ताईंना उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या हातून असेच कार्य घडो ही मनोकामना व खूप खूप शुभेच्छा !
लेखक – प्रा. प्रशांत प्रकाश बडगुजर, नाशिक
9922424314
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
She is a ideal role model to other women’s…she is a best women