सर्व स्त्रियांना समर्पित – सौ.भारती प्रकाश बडगुजर जळगाव

बायको जर नसेल तर, राजवाडा पण सुना आहे.
बायकोला नावं ठेवणे हा,खरंच गंभीर गुन्हा आहे.

खरं पाहिलं तर तिच्याशिवाय,पानही हालत नाही.
घरातलं कोणतंच सुख,बायकोशिवाय फुलत नाही

नोकरी अन पगाराशिवाय नवऱ्याजवळ
आहे काय ?
तुलनाच जर केली तर सांगा,तुम्हाला तरी
येतंय काय ?

स्वच्छ,सुंदर,पवित्र घर बायको मुळेच असतं …
नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं.

वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते…
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय म्हणूनच जास्त असते.

तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते,
कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते…

चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर
तुम्हीच सांगा काय होणार चोवीसतास जुंपल्यावर

बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका,
तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर एकवर बसू नका.

बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा…
बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा…

बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं…
देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं… !

नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा,
तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत रहा.

कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे …
तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी आनंदाने झेलावे.

बोलत असते संसारा साठी वाईट कधी मानू नये,
चोरते पैसे संसारासाठी चोरटी तिला म्हणु नये.

तुच सांग लेका गाडा संसाराचा तिच्या शिवाय
चालणार का ?

      *मी म्हणुन संसार चालत नाही...*
      *तू सुई तिन दोरा व्हायच असत,*
      *संसाराचं ठीगळ वेड्या...*
      *आपल आपणच शिवायच असत.*

सौ.भारती प्रकाश बडगुजर जळगाव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*