जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वप्रथम माता, भगिनी, काकूंना, आजी, मावशी, आत्या, बायको, मुलगी अशा सर्व रूपातील महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली तो जिजाऊचा “शिवबा” झाला… ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा “ज्ञानदेव” झाला…ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा “श्याम” झालाआणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सितेचा “राम” झाला……

समान हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात महिलांनी मोठा लढा दिला. त्यामुळेच आज आपण स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगती पथावर पाहतो. तसंच महिलांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध स्तरावरील प्रगतीचा सन्मान या दिनानिमित्त करण्यात येतो. मात्र आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला आई, आजी, बहिण, मैत्रिण, बायको, मुलगी या सर्वांचाच सन्मान करण्याचा हा दिवस. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या असंख्य लहान सहान गोष्टींची जाणीव ठेवून त्यांचा आदर करण्याचा हा दिवस. 


स्त्री ने अनेक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत ती अगदी लिलया सांभाळते. मात्र या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे, इच्छांकडे, मतांकडे दुर्लक्ष करु नका. कोणतरी चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. तुमच्या इतकंच तुमच्या इच्छांना, विचारांना आणि मतांना महत्त्व द्या. जागतिक दिनानिमित्त हा एक बदल आपण आपल्यात नक्कीच करु शकतो.

शुभेच्छूक : बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*