साई बडगुजर गांधी विचार संस्कार परिक्षेत जळगांव जिल्हात पहिला

साई बडगुजर

जळगांव येथील गांधी रीसर्च फाऊंडेशनतर्फे २ अॉक्टोबरला घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात कुर्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी साई घन: श्याम बडगुजर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. समन्वयक शिक्षक डी.एस.सूर्यवंशी यांचे कौतुक करण्यात आले.


गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे २००७ पासून या परीक्षेचे आयोजन केले जाते. याचा मुख्य उद्देश याचा आपल्या भावी पिढीमध्ये महात्मा गांधी यांची जीवनमूल्ये, विचार रुजवणे आणि आदर्श नागरिक घडवणे असा आहे. संपूर्ण भारतातील १२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. सुमारे सहा हजार शाळा-महाविद्यालयांनी स्पर्धेला प्रतिसाद दिला. त्यात कुर्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचे २३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, असे डी. एस. सूर्यवंशी यांनी सांगितले. शाळेतील ५ ते ८ मधील प्रत्येक वर्गाप्रमाणे प्रथम, द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवर तसेच शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. मुख्याध्यापक डी.डी.पाटील, पर्यवेक्षक आर.व्ही.गवळी, ए.बी.बडगुजर, ई.एस.बाविस्कर, एल.पी.पाटील, व्ही.व्ही.जंजाळे, आर.जी.बडगुजर, एच.एन.बडगुजर उपस्थित होते.

साई घनश्याम बडगुजर यांस हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छक :

  • अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
  • बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*