छ. संभाजीनगर येथील श्री. कैलास लक्ष्मण बडगुजर यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी (ओबीसी मोर्चा पश्चिम) निवड

छ. संभाजीनगर: महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब, मंत्री – मा. अतुलजी सावे साहेब, मा. केंद्रीय राज्य मंत्री मा.डॉ. भागवतजी कराड साहेब, प्रदेश सरचिटणीस आ.मा. श्री. संजयजी केणेकर साहेब, आमदार मा. श्री. प्रशांतजी बंब
साहेब, मराठवाडा विभाग संघटण मंत्री मा. श्री. संजयजी कौडगे साहेब, छत्रपती संभाजीनगर (प.) जिल्हाध्यक्ष – मा. श्री. संजयजी खंबायते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारीणीची संघटणात्मक रचनेतील महत्वपुर्ण भाग असलेली कार्यकारीणी नियुक्ती नुकतीच घोषणा करण्यात आली.

यामध्ये बडगुजर समाज मंडळ छ. संभाजीनगर नगरचे अध्यक्ष, तत्पर सामाजिक कार्यकर्ते श्री. कैलास लक्ष्मण बडगुजर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे बडगुजर.इन कडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनः पूर्वक शुभेच्छा !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*