बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय परिषद समिती प्रमुख पदी मंडळाचे खजिनदार श्री. राहुल प्रकाश बडगुजर यांची निवड

पुणे – दिनांक 24.8.2025 रोजी बडगुजर समाज बहुऊद्देशीय संस्था पुणे कार्यकारणीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये 15 ऑगस्ट ला झालेल्या कार्यक्रमाचा हिशोब कार्यकारणी समोर मांडण्यात आला व सर्व मताने तो मंजूर करण्यात आला.

तसेच यावेळी अखिल भारतीय बडगुजर समाज अध्यक्षीय परिषद घेण्या संदर्भात चर्चा झाली. बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे तर्फे अखिल भारतीय बडगुजर समाज अध्यक्षीय परिषद लवकरच घेण्यात येणार आहे. संबंधित निर्णयासाठी व नियोजनासाठी मंडळा तर्फे अखिल भारतीय बडगुजर समाज अध्यक्षीय समिती प्रमुख म्हणून श्री. राहुल प्रकाश बडगुजर यांची निवड करण्यात आली. श्री. राहुल प्रकाश बडगुजर यांची समिती प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच बडगुजर.इन टिम कडून ही त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील नियोजनासाठी शुभेच्छा.


त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

1 Comment

  1. सामाजिक मार्गदर्शक *श्री राहुल बडगुजर साहेब, पुणे*
    यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

    🌷🌱🌳🌈
    डॉ दि धों बडगुजर अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*