चिंचोली तालुका यावल येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. मिलिंद चिंधु बडगुजर यांची महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यामधून निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी आपल्या शाळेमध्ये विविध नवीन उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यासाठी राज्यस्तरावरती नवोपक्रम स्पर्धा राबविली जात असते. बडगुजर समाजातील प्रा. मिलिंद बडगुजर हे नेहमी आपल्या शाळेमध्ये नवीन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनाचे कार्य करत असतात. त्यांची या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातून निवड होणे हे बडगुजर समाजासाठी अत्यंत भूषणावह अशी बाब आहे.
मागील महिन्यामध्येच त्यांना ठाणे येथील समर्थ फाउंडेशनच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच चोपडा येथील पंकज शैक्षणिक समूहमार्फत सुद्धा त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. एक उत्कृष्ट प्राध्यापक, शिक्षक, लेखक, कवी, सूत्रसंचालक, निवेदक, बातमीकार, व्याख्याते, वक्ते म्हणून सरांचा नेहमीच नावलौकिक आहे. बडगुजर डॉट इन या मध्ये सुद्धा सरांचे अनेक लेख आणि बातम्या प्रसिद्ध होत असतात. नवनवीन उपक्रम घेण्यामध्ये सर नेहमी हिरीरीने भाग घेत असतात. अत्यंत कार्यकुशल, नेतृत्व गुण संपन्न, संघटन कौशल्य प्राप्त असलेले, स्पष्ट वक्ते, सहकार्य वृत्ती जोपासणारे म्हणून सर्वांना त्यांचा परिचय आहे.

यावर्षीच्या सन 2024-25 साठी नवोपक्रम स्पर्धेसाठी जिल्हाभरातून 51 शिक्षकांनी नोंदणी केली होती. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक गट असे दोन गट पाडले जातात. त्यात माध्यमिक गटामध्ये प्राध्यापक मिलिंद बडगुजर यांनी 12 th standard students Learn English Comparing ..म्हणजेच इयत्ता बारावीची मुले शिकली इंग्रजीतून सूत्रसंचालन हा उपक्रम आपल्या शाळेत राबवला होता. इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयातील लेखन कौशल्य रायटिंग स्किल यामध्ये प्रश्न क्रमांक चौथा सी मध्ये कम्पेरिंग म्हणजेच सूत्रसंचालन संहिता लेखन यावर प्रश्न विचारला जात असतो. या प्रश्नाची तयारी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीतून करून घेण्यासाठी त्यांनी सदरचा उपक्रम राबविला होता. प्रथम फेरीमध्ये जळगाव जिल्ह्यामधून सात नवोपक्रमांची निवड करण्यात आली होती.
दिनांक 13 जानेवारी 2025 सोमवार रोजी या स्पर्धेची द्वितीय फेरी जळगाव येथील डाएटच्या अध्यापिका महाविद्यालयात पार पडली. यासाठी डाएटचे प्राचार्य आदरणीय अनिल झोपे तसेच साळुंखे सर, भोळे मॅडम आणि इतर अशा पाच सदस्यांची समिती जिल्हा स्तरावरील नवोपक्रम निवडण्यासाठी नेमण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक नवोपक्रम स्पर्धकाला आपल्या उपक्रमाचे सादरीकरण पीपीटी च्या माध्यमातून करावयाचे होते आणि त्यानंतर या समितीने त्यांची मुलाखत घेऊन विविध प्रश्नांच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. त्यात प्रा मिलिंद बडगुजर यांच्या उपक्रमाची निवड या दुसऱ्या फेरीमधून करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर निवडल्या गेलेल्या पहिल्या पाच नवोपक्रम विभागीय स्तरावर पाठविले जातात.

यानंतर विभागीय स्तरावरती त्यांच्या नवोपक्रमाची पुन्हा अशाच पद्धतीने परीक्षण केले जाणार आहे. त्यात यशस्वी झाल्यानंतर राज्यस्तरीय उपक्रमासाठी त्यांना पुढे पाठविले जाणार आहे. यासाठी मिलिंद बडगुजर सर यांना अनेक अनेक शुभेच्छा. जळगाव जिल्ह्यामधून निवड झालेल्या या उपक्रमाची माहिती एका पुस्तकातून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण यांच्यामार्फत प्रकाशित केली जाणार आहे. त्यात त्यांच्या नवोपक्रमाची सविस्तर माहिती राहणार आहे. तसेच जिल्हास्तरावर सुद्धा त्यांना गौरविण्यात येणार आहे. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड व्हावी आणि महाराष्ट्र राज्यातून घेतल्या जाणाऱ्या नवोपक्रमांमध्येही त्यांचा प्रथम क्रमांक यावा यासाठी स्वामी चरणी प्रार्थना. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक अखिल भारतीय बडगुजर महा समिती बडगुजर युवक समिती बडगुजर प्रौढ ग्रुप
शब्दांकन श्री. सागर राजेंद्र बडगुजर एरंडोल
प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव. ( 9421184495 )
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा