बहादरपूर येथील श्री. राजेंद्र पुंडलीक बडगुजर (आर. पी. बडगुजर सर, सेवानिवृत्त पर्यवेक्षक, रा. का. मिश्रा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज) यांच्या धर्मपत्नी सौ. स्वाती राजेंद्र बडगुजर यांची बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्था संचलित रा. का. मिश्रा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथमच संचालक पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
सदर शिक्षण संस्थेची स्थापना १९५१ साली झाली असून आजपर्यंत एकही महिला संचालक नव्हती. सौ. स्वाती राजेंद्र बडगुजर या संस्थेच्या पहिल्या महिला संचालक म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळविणाऱ्या प्रथम महिला ठरल्या आहेत.
त्यांचे सासरे कै. पुंडलीक दगडू शेठ यांनी संस्थेच्या व्यवस्थापक पदाची धुरा अनेक वर्षे यशस्वीरित्या सांभाळली होती. त्यांच्या कार्याचा वारसा सौ. स्वाती राजेंद्र बडगुजर पुढे चालवत आहेत.

या ऐतिहासिक यशाबद्दल स्वातीताई यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज, बडगुजर युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप, आणि बडगुजर.इन तर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
Congratulations Sau.Swati Badgujar & Family Bahadarpur 🌹🌺🌷🇮🇳🚩