एरंडोल:- येथील बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचा सभागृह भूमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक ११/१०/२०२४ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता गांधीपुरा,पाण्याच्या टाकीजवळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.श्री. अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील व हस्ते करण्यात आला.यावेळी श्री.अमोलदादांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र पवार, श्री. मनोज भाऊ पाटील यांच्या सत्कार उपाध्यक्ष श्री.उमेश बडगुजर, श्री.आनंदभाऊ दाभाडे यांच्या सत्कार श्री.प्रविण बडगुजर, व इतर मान्यवरांचा सत्कार मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.सदर सभागृहासाठी मा.आमदार आबासाहेब श्री.चिमणरावजी पाटील यांनी २० लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे.सदर कार्यक्रमास समाज बंधू- भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रत्नाबाई बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.निंबा बडगुजर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली
Leave a Reply