के.सी.ई.सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव इव्हेंट मॅनेजमेंट विभाग व प्रोलिफिक जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन दि. ११-१०-२०४ वार शुक्रवार रोजी जळगाव येथे करण्यात आले होते. सदर सोहळ्यामध्ये जळगाव येथील काशिनाथ पलोड सीबीएससी स्कूलच्या शिक्षिका सौ शुभांगी बडगुजर यांना संगीत व शिक्षण या क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून सन्मानपूर्वक नारी शक्ती सन्मान २०२४ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जळगाव शहरातील संगीत व शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. सौ. शुभांगी बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
अभिनंदन
अभिनंदन