रोटरी क्लब नंदुरबार मार्फत 15 आदर्श शिक्षकांना नॅशन बिल्डर अवॉर्ड सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार श्री मिलिंद कुलथे , रोटरीचे पीडीपी श्रीकांतजी इंदानी, लोकमतचे जिल्हा संपादक रमाकांतजी पाटील, तुलसी हॉस्पिटलचे संचालक डॉ.रोशनजी भंडारी सर, असिस्टंट गव्हर्नर राकेशजी जयस्वाल, उद्योगपती मनिष शाह या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक केशव राजभोज सर यांनी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा विकास करणाऱ्या शिक्षकांचा सर्वे करून योग्य शिक्षकाला न्याय मिळाला पाहिजे या हेतूने रोटरीच्या माध्यमातून शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येत आहे असे सांगितले.यांत
रविंद्र मोहन बडगुजर
(सहाय्यक शिक्षक)
B.A, B.Ed, M.Ed(llnd), Yog Diploma.
जि. प. उच्च प्राथ. शाळा घोडलेपाडा,
केंद्र – मंदाणा,
ता. शहादा, जि. नंदुरबार
धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील, अतिदुर्गम भागातील उडद्या या गावी सात वर्षे सेवा केली. विद्यार्थी पटसंख्या 42 वरुन 92 पर्यंत पोहचवली. पुर्वी वापरला जाणाऱ्या पिशवी शाळा या शापित शब्दापासून बाहेर काढुन नावलौकिक शब्द असणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय शाळा’ या प्रवासात सामिल होता आले.
जुन 2018 पासून शहादा तालुक्यातील घोडलेपाडा (100 टक्के आदिवासी वस्ती असलेले गाव) या गावी कार्यरत आहे.
शिक्षक किंवा शिक्षण विभाग शाळा बोलकी करतात (म्हणजे शाळेच्या भिंती, संरक्षण भिती/ वालकंपाऊंड रंगवणे) परंतु, कोरोना काळात मी संपूर्ण गावच बोलके केले.तसेच कोरोना काळात शासकीय आदेश येण्यापूर्वीच शाळेत विद्यार्थी व शिक्षकांसाठी आवश्यक असणारे सुरक्षेची साधने, साहित्य उपलब्ध केले होते. या कार्याची दखल तत्कालीन DYSP मा. श्री चंद्रकांत सपकाळे साहेब यांनी बोलवून घेत स्वतः सत्कार करुन ‘कोरोना योध्दा’ म्हणून प्रशस्तीपत्र देउन सन्मान केला.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर मुल्यशिक्षण, श्रमशिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतःबरोबर विद्यार्थ्यांमधे नैतिकता या गुणधर्माची जोपासना करण्याचा प्रयत्नशील असतो. पालक, गावकऱ्यांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. बाहेरगावी असणाऱ्या माझ्या वर्गमित्रमैत्रिणींच्या सहकार्याने विद्यार्थी व शाळेकरीता अनेक उपयोगी वस्तू घेतल्या.त्यामुळे शाळेत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो.
अशी कामगिरी पाहता शहाद्याचे गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. योगेशजी सावळे साहेब यांनी शहादा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चिंचपाणी येथे जुन 2024 पासून नव्यानेच सुरू होणाऱ्या शाळेची जबाबदारी विश्वासाने माझ्याकडे दिली आहे.
अशा दैवी नानाविध गुणरुपी बळावरच एखाद्या सामाजिक संस्थेकडून दुसऱ्यांदा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारास पात्र ठरलो आहे. यापुर्वी शहादा येथील ‘सन्मित्र बहुउद्देशिय मंडळ’ यांचेकडून सन 2022 मध्ये ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला यावेळी एकूण पंधरा शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. श्री.रविद्र मोहन बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री.रविद्र मोहन बडगुजर – 97656 07177
💐💐Congratulations