रात्रीच्या गर्भातच आहे उद्याचा उषःकाल याच आशेने की भ्रमाने आपण धावतच रहातो. “वेडात मराठे वीर दौडले सात” तसे आपल्याला जसा काही सुवर्णमृगच मिळणार आहे या आशेने, शेवटी जाताना रिक्त हातानेच जायचे आहे हे माहीत असूनसुद्धा हव्यास सुटत नाही. माझे माझे करण्यातच जन्म जातो पण मोह जात नाही. संचिताचे भोग भोगत असताना नवीन चांगले कर्म करायची जरी इच्छा झाली तरी जगनियंत्याने आपल्याला आपले कर्म ठरवूनच जन्म दिला आहे. तर मग आपण कठपुतळीच्या खेळातील बाहुल्याच आहोत. मग आपला पराक्रम तो काय? शेवटी कर्ता करविता तोच आहे म्हटल्यावर आपले स्वतःच अस्तित्व ते काय? स्वतःच स्वत्व गमावून त्याच्याच इच्छेनुसार चालणाऱ्या खेळातील आपण खेळाडू तर नाहीत? खेळ ठरलेला आहे आणि खेळाचा निकालही! आपल्याला मात्र अनभिज्ञ ठेवून अपेक्षांचा भ्रमावर धावायला लावतो, तो पडद्या आडचा सूत्रधार मला जरा निर्दयीच वाटतो. कधी कधी मध्येच एखादा अनपेक्षित निर्णय देऊन तो ‘मी किती प्रेमळ आहे’ असा भ्रम निर्माण करतो आणि याच भ्रमाच्या शिदोरीवर माणूस पुढच्या अनपेक्षित निर्णयाची वाट पहात वाटचाल करत रहातो, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीसारखे! आपल्याला असे वाटते की आपल्या भोवती सर्व जग फिरते आहे. पण हा भ्रम असतो. उलट आपणच कोणत्यातरी अज्ञात शक्ती भोवती फिरत असतो, अनभिज्ञपणे!
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265



Leave a Reply