नवे वर्ष – लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

नवे वर्ष

नव्या वर्षाची, नवी पहाट
घेऊन आली ऊर्जेची लाट
स्वप्नांच्या दुनियेतूनी निघाली
उषःकालाची नवीन वाट

नवे वर्ष, नव्या कल्पना
नकोत त्या जुन्या वल्गना
सरत्या वर्षाच्या साऱ्या वेदना
विसरून नवे गीत गा ना

नवे वर्ष, नवा अंकुर
बीजातच माजले होते काहूर
आता पालवी लेऊन नवी
फुले सुंदर उद्याची दावी

नवे वर्ष, नवीन आशा
जीवनाच्या तऱ्हा कशा
तरीही आहे नवीन आशा
जीवन जगण्याचीही नशा

नव्या वर्षाची नवी गणिते
जगण्याची ही नवीन सूत्रे
नव्या कल्पना, नवीन रीती
जाणून घेऊ नवीन नीती

जगणे असावे आनंद‌गाणे
नको दुःख आणि खंतावणे
नव्या जगाची, नवीन गाणी
गात चालली माणसे शहाणी

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

1 Comment

  1. मान्यवर कवी श्री कैलास बडगुजर सरांची कविता खुप छान आहे!

Leave a Reply

Your email address will not be published.


*