बीजेपी ओबीसी मोर्चा जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणीत श्री रविंद्र पंडितराव बडगुजर यांची उपाध्यक्षपदी निवड – श्री. विनोद मोहकर, धरणगांव

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत असलेल्या ओबीसी समितीचे उपप्रमुख श्री रविंद्र पंडितराव बडगुजर यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सन्माननीय निवड झाली. त्याबद्दल त्यांचे क. भा. ब. स. महासमितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन ! दि. 13 मार्च 2024 रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशाने, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री मा. श्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी मा. श्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष मा. श्री अमोलदादा हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री धनंजय प्रभाकर पाटील यांनी आज जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. त्यात श्री रवींद्र बडगुजर यांची सन्माननीय निवड करण्यात आली. त्यांची ओबीसी मोर्चा च्या  उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बडगुजर.इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

2 Comments

  1. अभिनंदन श्री रवींद्र सेठ बडगुजर पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*