नाशिक येथील श्री. प्रशांत केशव बडगुजर यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया सेलच्या प्रदेश कार्यकारिणी मध्ये समावेश करण्यात आला व त्यांना भा ज यू मो सोशल मिडिया उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी निवड करण्यात आली. श्री. प्रशांत बडगुजर हे नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत. समजा कार्यात नेहमीच सक्रिय सहभागी असतात. नाशिक शहरात भा. ज. पा. साठी नेहमीच तत्परतेने कार्य करणारे एक प्रामाणिक कार्यकर्त्यास आज महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वर महत्वपूर्ण भूमिका बजावण्याचे कार्य भेटले त्या कार्यास ते नक्कीच यथायोग्य निभवतील हा दुढविश्वास आहे.
श्री. प्रशांत बडगुजर यांची निवड झालेवर त्यांनी बडगुजर.इन शी बोलतांना म्हटले की, मला माझ्या कामाची पावती मला आदरणीय विक्रांत दादा पाटील प्रभारी भा ज यू मो व महामंत्री भा ज पा, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर व युवा मोर्चा महामंत्री योगेश जी माईंद , निखिल चव्हाण दादा यांनी दिली. तसेच जळगांव येथे खा. उन्मेष दादा पाटील व राहुल भैया लोणीकर यानी अभिनंदन देखील केले. माझ्यावर प्रेम व आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार, जय श्रीराम, असे मत व्यक्त केले.
नाशिक येथील प्रशांत केशव बडगुजर यांची भा. ज. यु. मो. सोशल मिडिया उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे बडगुजर.इन व अ. भा. ब. स. युवक समिती कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐
Leave a Reply