सोनशेलु येथील नवसाला पावणारी जुनागड येथिल प्रतिकृती एक मुखी कुलस्वामिनी चामुंडा मातेचा भव्य यात्रात्सोव तिथी- माघ शु.बिज दि.11/02/2024 वार- रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात्रात्सोवानिमित्ताने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथील मोठ्या संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात.या मंदिराची स्थापना 1991 मध्ये सोनशेलु येथील प्रगतिशील शेतकरी कै.बाबुराव नामदेव बडगुजर यांनी गावकरी , पंचक्रोशीतील भाविक व बडगुजर समाजाच्या सहकार्याने स्वता:च्या मालकीची एक एकर जमीन दान देऊन भव्य असे मंदिर उभारले.1991 च्या आगोदर भाविकांना चामुंडा मातेच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातील जुनागड याठिकाणी जावे लागत असायचे. हे अंतर जास्त लांब असल्याने मातेचे मंदिर महाराष्ट्रत देखिल असावे.म्हणुन जुनागड येथील एक मुखी चामुंडा मातेचा प्रतिकृतीची प्रति स्थापन सोनशेलु येथे करण्यात आली.
या यात्रात्सोवात पालख्या,पाळणे,खेळणी दुकाने, हाॅटेल, व इतर साहित्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर येत असतात. यात्रेनिमित्ताने सकाळी 9 वाजता होमहवन, 10 वाजता महाआरती व महाप्रसादाचे मानकरी सेवानिवृत्त शिक्षक श्री लोटन भिला बडगुजर फागणे यांच्याकडुन आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आव्हान अध्यक्ष चामुंडा देवी ट्रस्ट, सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.


Leave a Reply