राणीचे बांबरुड ह. मु. पाचोरा येथील आदर्श शेतकरी श्री. बापूराव श्रावण बडगुजर व त्यांच्या पत्नी सौ. ज्योती बापुराव बडगुजर यांना येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय संचलन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री. किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. गणेश बापू पाटील व जिल्हा परिषद सदस्य श्री. रावसाहेब पाटील उपस्थित होते. या कार्यक्रम नंतर श्री. बापूसाहेब श्रावण बडगुजर व सौ. ज्योती बडगुजर
पुढिल कार्यक्रम साठी दिल्ली येथे निघाले.
कृषी आयुक्तालय संचालक फलो उत्पादन विभाग पुणे व जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव यांच्यातर्फे श्री. बापूसाहेब श्रावण बडगुजर यांना हे सपत्नीक निमंत्रण प्राप्त झाले आहे. केंद्रशासन राष्ट्रीय कृषी विकासाच्या प्रती थेंब अधिक पीक योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसवून प्रभावी कृषी विषयक कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिन दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात संचलन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी राज्यातील केवळ १० शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी सहपत्नीक आमंत्रित करण्यात आले असून त्यात पाचोरा येथील श्री. बाबुराव श्रावण बडगुजर व सौ. ज्योती बडगुजर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल बडगुजर दांपत्याचे परिसरातून कौतुक होत आहे व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. बापूसाहेब श्रावण बडगुजर – 9420657582


Leave a Reply